शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सांगली : सांगलीत सात महिलांचा बेकायदेशीर गर्भपात : चौगुले हॉस्पिटलवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:10 IST

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडाची सांगलीतही पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उजेडात आला. गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलवर महापालिकेच्या आरोग्य विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

ठळक मुद्देम्हैसाळच्या घटनेची पुनरावृत्ती मुदतबाह्य औैषधेइंजेक्शनसह दारूच्या बाटल्या जप्तरूपाली चौगुले चक्कर येऊन कोसळल्या

सांगली : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडाची सांगलीतही पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उजेडात आला. गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलवर महापालिकेच्या आरोग्य विभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. रुग्णालयातील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कर्नाटकातील सात महिलांचा बेकायदेशीरपणे गर्भपात केल्याचे स्पष्ट झाले आहे. १५ गर्भपाताची कीटस्, मुदतबाह्य औषधे, इंजेक्शनसह दारूच्या बाटल्या सापडल्याने त्या जप्त केल्या आहेत.

रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. रूपाली विजयकुमार चौगुले, डॉ. विजयकुमार शामराव चौगुले या दाम्पत्यासह व डॉ. स्वप्निल जगवीर जमदाडे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती. रूपाली चौगुले स्त्री-रोगतज्ज्ञ आहेत. त्यांचे पती एमबीबीएस, तर जमदाडे हे भूलतज्ज्ञ आहेत. जमदाडे हे चौगुले दाम्पत्याचे नातेवाईक आहेत. गणेशनगरमधील पाचव्या गल्लीत रुग्णालय आहे.

जमदाडेच्याच नावावर या रुग्णालयाच्या नर्सिंग हेत. त्याच रुग्णालय चालवितात. वैद्यकीय गर्भपात प्रतिबंध कायद्यांतर्गत त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. या रुग्णालयात बेकायदा गर्भपात केले जात असल्याची माहिती महापालिकेस मिळाली होती.

पथकाने गोपनीय चौकशी केली. त्यानंतर शनिवारी पथकाने शहर पोलिसांची मदत घेऊन छापा टाकला. या छाप्यात हॉस्पिटलची तपासणी करण्यात आली. एकूण १३ गर्भवती महिलांचे केसपेपर सापडले. यातील सात महिलांचा बेकायदेशीररित्या गर्भपात केल्याची माहिती पुढे आली. रुग्णालयात दोन तास झडती घेतल्यानंतर दारूच्या बाटल्या सापडल्याने पथकही अवाक् झाले.

मुदतबाह्ण औषधे, इंजेक्शन व गर्भपाताची १५ कीटस् सापडली. महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. झडतीचे काम सुरू असताना, रुग्णालयातील काही कर्मचाºयांनी औषधे जाळून टाकली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. रुग्णालयावर छापा पडल्याचे वृत्त समजताच परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कोणालाही आत सोडले जात नव्हते.रूपाली चौगुले चक्कर येऊन कोसळल्यापथकाची कारवाई सुरू असताना रूपाली चौगुले यांना चक्कर आल्याने त्या कोसळल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे स्वप्नील जमदाडे थांबून होते. रूपाली यांचे पती विजयकुमार हे कामानिमित्त मुंबईला गेले आहेत. रुग्णालयावर छापा पडल्याचे समजताच ते मुंबईतून सांगलीत येण्यास निघाले आहेत.सांगलीत गणेशनगर येथील पाचव्या गल्लीत चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलवर शनिवारी महापालिकेच्या आरोग्य पथकाने छापा टाकला.सांगलीत गणेशनगर येथील पाचव्या गल्लीत चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलवर शनिवारी छाप्याची कारवाई पूर्ण झाल्यानंतर पथक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून बाहेर पडले.सांगलीतील चौगुले मॅटर्निटी हॉस्पिटलवर शनिवारी छापा टाकून महापालिका अधिकाºयांनी कागदपत्रांची तपासणी केली त्यामुळे रुग्णालयात सर्वत्र साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.रुग्णालय सीलपथकाने औषधे, इंजेक्शन साठा व महत्त्वाची कागदपत्रे जप्त करून रुग्णालय सील केले आहे. रुग्णालयातील कपाटात दारूच्या बाटल्या सापडल्या. दारू कोणासाठी लागत होती? याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू होती. याप्रकरणी रुग्णालयातील कर्मचाºयांकडे चौकशी केली; पण त्यांनीही ‘आम्हाला काही माहिती नाही’, असे सांगून हात झटकले.‘म्हैसाळ’प्रकरणाची आठवण...संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाºया म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांडाचे प्रकरण अजून न्यायप्रविष्ट असताना, सांगलीत गर्भपाताचे प्रकरण उजेडात आल्याने खळबळ माजली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हैसाळमध्ये डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयात भ्रूणहत्याकांड उघडकीस आले होते. याप्रकरणी १४ संशयितांना अटक करण्यात आली होती. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात केलेले १९ अर्भक पोलिसांनी जप्त केले होते. या अर्भकांची ‘डीएनए’ चाचणी करण्यात आली. त्यातील काही अर्भक कुजलेल्या अवस्थेत होते. एकूण नऊपैकी आठ अर्भकांचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात पाच पुरुष जातीचे, तर तीन स्त्री जातीचे अर्भक होते. 

चौगुले हॉस्पिटलची चौकशी केल्यानंतर याठिकाणी संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचे तपासणीत समोर आले असून, या हॉस्पिटलकडे रीतसर गर्भपात किंवा तपासणीचा कोणताही परवाना नाही. याशिवाय कालबाह्य ठरलेली औषधे, गर्भपाताचे कीट अशा गोष्टी सापडल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल केला आहे.- डॉ. संजय कवठेकर,आरोग्य अधिकारी सांगली, मिरज, कुपवाड, महापालिका 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSangliसांगली