सांगलीत पती, सवतीकडून महिलेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:29 IST2021-01-08T05:29:06+5:302021-01-08T05:29:06+5:30
सांगली : कौटुंबिक कारणावरून शहरातील गणेशनगरमध्ये पती, सवतीने महिलेस लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती जनार्दन ...

सांगलीत पती, सवतीकडून महिलेस मारहाण
सांगली : कौटुंबिक कारणावरून शहरातील गणेशनगरमध्ये पती, सवतीने महिलेस लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी भारती जनार्दन माने (रा. गणेशनगर, सांगली) यांनी पती जनार्दन माने, सवत विद्या जनार्दन माने व त्यांची मुले संकेत व सार्थक यांच्याविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार, दि. ३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी भारती व पती जनार्दन यांच्यामध्ये दुसरी खाेली बघून देण्यावरून वाद झाला. यावेळी जनार्दन यांच्यासह त्यांची दुसरी पत्नी विद्या व त्यांच्या मुलांनी शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादी भारती या दरवाजामध्ये उभ्या असताना, विद्या हिने जोरात दरवाजा लावल्याने त्यांच्या बोटाला दुखापत झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.