शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

सांगलीत बेकायदा गर्भपातप्रकरणी डॉक्टर पतीलाही अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 12:19 IST

गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा महिलांचा गर्भपात करुन भ्रूणांची हत्या केल्याची घटना समोर आली होती.

सांगली : गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा महिलांचा गर्भपात करुन भ्रूणांची हत्या केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी डॉ. विजयकुमार शामराव चौगुले (वय ४५, रा. सिद्धिविनायक नक्षत्र अपार्टमेंट, विश्रामबाग) याला मंगळवारी (18 सप्टेंबर) सकाळी अटक करण्यात आली आहे. पत्नी डॉ. रुपाली चौगुलेस अटक होताच तो पोलिसांना शरण आला. मात्र त्याचा मेहूणा डॉ. स्वप्नील जगवीर जमदाडे हा अजूनही फरारी आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहेत.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने चार दिवसापूर्वी चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकून बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आणले होते. याप्रकरणी चौगुले दाम्पत्यासह डॉ. स्वप्नील जमदाडे याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. रुग्णालयावर टाकलेल्या छाप्यात गर्भपाताची किटस्, औषधी गोळ्या, इंजक्शनचा साठा जप्त केला होता. गर्भपात केलेल्या महिलांचे केस पेपर व तसेच आक्षेपार्ह कागदपत्रेही सापडली होती. आतापर्यंतच्या तपासात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ महिलांचा गर्भपात केल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासामध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी डॉ. रुपाली चौगुले हिला अटक केली आहे. सध्या ती पोलीस कोठडीत आहे. पत्नीला अटक झाल्याचे समजताच डॉ. विजयकुमार चौगुले मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आला. त्याला अटक करुन न्यायालयात उभे करण्यात आले आहे.

गर्भपात केलेल्या नऊ महिलांची नावे व पत्त्यावरुन त्यांचा शोध घेण्यात आला आहे. या महिलांचे जबाब घेण्यासाठी पोलिसांचे चार पथके सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात रवाना केली आहेत. या महिलांनी गर्भपात कधी केला? गर्भपात करण्यामागे काय कारण होते? त्यांना गर्भपातासाठी चौगुले हॉस्पिटलमध्ये कोणी पाठविले? सोनोग्राफी तपासणी कुठे केली? या सर्व बाबींचा उलघडा जबाबातून केला जाणार आहे. याशिवाय संबंधित महिलांच्या पतींनाही चौकशीसाठी बोलवले जाणार आहे. दरम्यान अटकेतील चौगुले दाम्पत्याची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून त्यांनी आतापर्यंत किती महिलांचे गर्भपात केले? गर्भपातासाठी लागणारी औषधे कोठून आणत होते? याचा प्रथम उलघडा केला जाईल, असे पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले. 

कर्मचाऱ्यांकडे चौकशी 

रुग्णालयात दोन महिला व एक पुरुष, असे तीनच कर्मचारी आहेत. त्यांनाही चौकशीच्या फेऱ्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे. त्याआधारे पुढील तपासाला दिशा देण्यात आली आहे. गर्भपात करण्यासाठी या महिला कोणाच्या माध्यमातून येत होत्या? यासाठी चौगुले दाम्पत्य किती पैसे घेत होते? याविषयी कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली जात आहे. त्यांचा यामध्ये कितपत सहभाग आहे, हे पाहून पुढील कार्यवाही केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टर