शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : राज्यात पैलवानांप्रती उदासिनता, गौतम पवार : आठ वर्षांपासून मानधनचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 11:32 IST

राज्यातील पैलवानांप्रती शासनस्तरावर प्रचंड उदासिनता दिसून येते. जिल्ह्यातील अपघाती मृत्यू झालेल्या मल्लांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली तरी त्यांना मदत मिळत नाही. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांचे मानधनही गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे, अशी व्यथा मंगळवारी नगरसेवक गौतम पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.

ठळक मुद्देहिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांचे मानधनही वर्षांपासून बंद नगरसेवक गौतम पवार यांनी मांडली व्यथा कुस्तीक्षेत्रात दबदबा असलेल्या महाराष्ट्रात नवे मल्ल तयार होताना अडचणी

सांगली : राज्यातील पैलवानांप्रती शासनस्तरावर प्रचंड उदासिनता दिसून येते. जिल्ह्यातील अपघाती मृत्यू झालेल्या मल्लांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली तरी त्यांना मदत मिळत नाही. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांचे मानधनही गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे, अशी व्यथा नगरसेवक गौतम पवार यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.पवार म्हणाले की, हरीयाणा, पंजाबसारख्या राज्यांमध्ये पैलवानांना शासनाची मदत मिळते. महाराष्ट्रात मात्र आहे तेसुद्धा मानधन मिळत नाही. त्यामुळे कुस्तीक्षेत्रात दबदबा असलेल्या महाराष्ट्रात नवे मल्ल तयार होताना अडचणी येत आहेत.

सांगली जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अपघातात सहा मल्ल जागीच ठार झाले. त्यांची कुटुंबे अक्षरश: उद्ध्वस्त झाली. तरीही शासनाकडून त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे आम्ही आता शासनाच्या मदतीची अपेक्षा न बाळगता घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेवेळी मदतपेटी ठेवून संबंधित मल्लांच्या कुटुंबियांसाठी मदत संकलन करणार आहोत. जास्तीत जास्त मदत त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू.एक पैलवान घडताना संबंधित कुटुंबांची काय कसरत होत असते, याची कल्पना आम्हाला आहे. त्यामुळे कोणत्याही पैलवानाचा अपघाती मृत्यू झाला किंवा तो अधू झाला तर संपूर्ण कुटुंब अडचणीत येते. कुस्तीक्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांसाठी शासनाची कोणतीही योजना नाही.

हिंदकेसरी विजेत्यासाठी १0 हजार आणि महाराष्ट्र केसरी विजेत्यास ५ हजार रुपये मानधन देण्याची शासनाची योजना असली तरी गेल्या आठ वर्षांपासून हे मानधनसुद्धा बंद आहे. या स्पर्धांमधील विजेत्यांना जीप देण्याचाही निर्णय झाला होता. त्याचीही अंमलबजावणी नाही. त्यामुळे शासनामार्फत कुस्तीक्षेत्रासाठी भरीव अशी मदत करायला हवी, असे ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीSportsक्रीडा