ज्येष्ठ मल्लांचे मानधन तीन वर्षे थकीत अपुर्‍या निधीचे कारण : उतारवयात मारावे लागत आहेत क्रीडा कार्यालयात हेलपाटे

By admin | Published: May 10, 2014 12:12 AM2014-05-10T00:12:49+5:302014-05-10T00:12:49+5:30

सचिन भोसले ल्ल कोल्हापूर गेली तीन वर्षे राज्यातील ज्येष्ठ कुस्तीगीरांना शासनाचे मानधनच न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत

For the last three years, due to lack of adequate funds, the wages of the senior wrestlers are over. | ज्येष्ठ मल्लांचे मानधन तीन वर्षे थकीत अपुर्‍या निधीचे कारण : उतारवयात मारावे लागत आहेत क्रीडा कार्यालयात हेलपाटे

ज्येष्ठ मल्लांचे मानधन तीन वर्षे थकीत अपुर्‍या निधीचे कारण : उतारवयात मारावे लागत आहेत क्रीडा कार्यालयात हेलपाटे

Next

सचिन भोसले ल्ल कोल्हापूर गेली तीन वर्षे राज्यातील ज्येष्ठ कुस्तीगीरांना शासनाचे मानधनच न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ऐन तारुण्यात लाल मातीत दबदबा राखणारे व उर्वरित आयुष्यात आखाड्याशी एकनिष्ठ राहिलेल्या या मल्लांना आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी या मानधनाचाच आधार आहे. मात्र निधीच्या कमतरतेचे कारण सांगून गेली तीन वर्षे मानधन देण्यात टाळाटाळ होत असल्याने या मल्लांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील हिंदकेसरी, डबल महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी, आदी स्पर्धांमध्ये यश मिळवून राज्याचा नावलौकिक वाढविणार्‍या ज्येष्ठ व वयाने साठी ओलांडलेल्या मल्लांना १९९५-९६ मध्ये भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या युतीच्या काळात व मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यामुळे दरमहा मानधन देण्याचा निर्णय झाला. १९९६ मध्ये सुरू झालेले मानधन अगदी विनाथकीत मे २०११ पर्यंत मिळत होते. मात्र, यानंतर अचानकपणे राज्य शासनाने हे मानधन देणे बंद केले. तब्बल ३६ महिने झाले हे मानधन अद्यापही दिलेले नाही. आपल्या उतारवयातही क्रीडा कार्यालयात हेलपाटे मारून मंत्र्यांना निवेदन देऊन ही मंडळी आता घाईला आली आहेत. या मानधनावरच आपला उदरनिर्वाह करावा लागत असल्याने उसनवारीही करावी लागत आहे. त्यांनी गेल्यावर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. त्यांनी मी त्वरीत मानधन सुरू करतो असे अश्वासन दिले होते. तत्काळ मी सर्व मल्लांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी गाठ घालून देतो असे सांगीतले होते मात्र हे आश्वासन हवेतच विरले आहे. अगदी परवापर्यंत जिल्'ाचे पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही या ज्येष्ठ मल्लांच्या थकीत मानधनाविषयी क्रीडा खात्याकडे पाठपुरावा करून तातडीने मानधन देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही त्यांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे सांगा कसं जगायचं असा सवाल या मल्लांकडून विचारला जात आहे. आयुष्यभर कष्ट आणि उतारवयात आजारपण आयुष्यभर कुस्ती आणि कुस्तीच याचा विचार करून काही मल्लांनी आपले घरदार सोडून तालीम हीच आपली आई व घर म्हणून आपले सर्वस्व पणाला लावले होते. तारुण्यात अनेक मैदाने या मल्लांनी गाजविली. मात्र, उतारवयात उदरनिर्वाह चालण्यासाठी शासनाने दिलेल्या या मानधनावर काही ज्येष्ठ मल्ल उदारनिर्वाह करत आहेत. मात्र मानधनच न मिळाल्याने हे मल्ल हवालदिल झाले आहेत. मानधनाचे बजेटच अपुरे राज्य शासनाने क्रीडा खात्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणार्‍या मल्लांना अपुरा निधी मंजूर केला होता. त्यामुळे गेले तीन वर्षे हे मानधन रखडले होते. याचबरोबर ज्येष्ठ खेळाडूंची संख्या वाढत आहे येणारा निधी अपुरा आहे. त्यामुळ े हे मानधन या ज्येष्ठ खेळाडूंपर्यंत पोहोचू शकले नाही. मात्र, येत्या आठ दिवसांत हे मानधन थेट या खेळाडूंच्या नावावर बँकेत जमा करण्यात येणार असून या प्रस्तावावर नुकतीच राज्याचे क्रीडा संचालकांनी सही केली आहे -नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी

Web Title: For the last three years, due to lack of adequate funds, the wages of the senior wrestlers are over.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.