शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी नसलेल्या चार वसतिगृहांचे अनुदान रोखले, सांगली जिल्हा परिषदेने केली कारवाई

By अशोक डोंबाळे | Updated: October 19, 2022 18:38 IST

वसतिगृह चालकांना मान्यता का रद्द करू नये, अशी नोटीसही प्रशासनाने दिली आहे.

सांगली : जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील वसतिगृहांची अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी माहुली (ता. खानापूर) आणि सांगलीतील तीन अशा चार वसतिगृहामध्ये एकही विद्यार्थी दिसून आला नाही. म्हणूनच चारही वसतिगृहांमधील कर्मचाऱ्यांचे पगार आणि अनुदानही रोखले आहे. या वसतिगृह चालकांना मान्यता का रद्द करू नये, अशी नोटीसही प्रशासनाने दिली आहे.समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी जिल्हा परिषद अनुदान देत असलेल्या ५५ वसतिगृहांची अचानक तपासणी केली होती. या तपासणीमध्ये माहुली (ता. खानापूर) येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यार्थी वसतिगृह आणि सांगलीतील मा. ह. वि. गो. सर्वोदय छात्रालय, यशवंत विद्यार्थी वसतिगृह, बी. आर. आंबेडकर वसतिगृहांमध्ये एकही विद्यार्थी दिसून आला नाही. याबद्दल संबंधित संस्थेकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली होती. म्हणूनच जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने तपासणीत विद्यार्थी नसलेल्या वसतिगृहांचे ऑगस्ट, महिन्याचे अनुदान आणि कर्मचाऱ्यांचे पगार रोखले आहेत. संबंधित वसतिगृह चालकांना नोटीस बजावून त्यांचा खुलासा घेऊन त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे, असे समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी दिली.

या वसतिगृहांचे अनुदान रोखले

  • सरदार वल्लभभाई पटेल विद्यार्थी वसतिगृह माहुली (ता. खानापूर)
  • मा. ह. वि. गो. सर्वोदय छात्रालय, सांगली
  • यशवंत विद्यार्थी वसतिगृह, सांगली
  • बी. आर. आंबेडकर वसतिगृह, सांगली.

५५ वसतिगृहांना साडेअठावीस लाखांचा निधी वर्गजिल्ह्यातील ५५ वसतिगृहांमधील अधीक्षक, चौकीदार आणि स्वयंपाकी, आदी १६३ कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांच्या पगारासाठी २८ लाख ४७ हजार ५७५ रुपये जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने संबंधित वसतिगृहांना वर्ग केले आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील अनेक वसतिगृहांमधील कामकाज चांगले आहे. पण, चार वसतिगृहांमध्ये एकही विद्यार्थी चौकशीत दिसून आला नाही. म्हणून संबंधित चार वसतिगृहांमधील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन रोखले आहे. तसेच संबंधित वसतिगृह चालकांना आपल्याकडे विद्यार्थी नसल्यामुळे आपली मान्यता का रद्द करू नये, अशी नोटीसही बजावली आहे. - बाळासाहेब कामत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदSchoolशाळा