शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

सांगली : एफआरपीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १७ ला कोल्हापुरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 12:19 IST

एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. आता साखरेचे भाव वधारत आहेत, त्यामुळे एफआरपी घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि. १७ फेब्रुवारीरोजी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे व जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा आठ दिवसात दराचा प्रश्न न सुटल्यास चंद्रकांतदादा पाटील यांची गाडी अडविण्याचा इशारा

सांगली : एफआरपीची रक्कम देणे कायद्याने बंधनकारक आहे. आता साखरेचे भाव वधारत आहेत, त्यामुळे एफआरपी घेतल्याशिवाय कारखानदारांना सोडणार नाही. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दि. १७ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे व जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी सांगितले. आठ दिवसात दराचा प्रश्न न सुटल्यास महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची गाडी अडविण्याचा इशारा देण्यात आला.येथील शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्यातील मोचार्बाबत संघटनेची बैठक झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील, माजी जिल्हाध्यक्ष सयाजी मोरे उपस्थित होते. सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात कर्नाटकात गाळपासाठी गेला.ऊस कमी होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने एफआरपी अधिक १०० रुपये आणि दोन महिन्यांनतर १०० रुपये देण्यावर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात एकमत झाले. परंतु काही कारखान्यांनी एफआरपी अधिक २०० एकदम देण्याचे जाहीर करुन टाकले. जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर केल्याप्रमाणे ऊसाची बिलेही जमा करायला सुरुवात करण्यात आली होती.हंगामापासूनच साखरेच्या दरात घट झाली. साखरेचा भाव प्रतिक्विंटलवर २८०० रुपयांवर येऊन पोहोचला. एफआरपी देता देता कारखान्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले. एफआरपीप्रमाणे पहिली उचल उपलब्ध होत नसल्याने कोल्हापूरच्या धर्तीवर जिल्ह्यातील कारखानदारांनी एकत्र येत २५०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला.

त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. त्याविरोधात कोल्हापुरातील साखर सहसंचालक कार्यालयावर खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. साखरेचे दर पडले असले तरी उपपदाथार्पासूनही कारखानदारांना उत्पन्न मिळते. त्यातील पैसे शेतकऱ्यांना दिले जात नाहीत.साखरेच्या दरात तेजी होती, तेव्हा तर जादा दर दिला होता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मागील आठवड्यात साखरेचा दरात अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे कारखानदारांनी हंगाम सुरू होताना जो दर जाहीर केला आहे तो ऊस उत्पादकांना मिळाला पाहिजे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना पैसे न देण्याबाबत आघाडी केली आहे.

कारखान्यांनी जाहीर केलेल्या दरात एक रुपयाही कमी घेणार नाही. सरकार आणि साखर कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी कोल्हापुरात मोर्चा काढला जाणार आहे. आठ दिवसात दराचा प्रश्न मिटल्यास हंगामापूर्वी प्रश्न सोडविणाऱ्या महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची गाडी अडवण्यात येईल, असा इशारा प्रवक्ते खराडे यांनी दिला.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर