सांगलीत परप्रांतीय कामगाराचा पाच तोळे दागिन्यांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:27+5:302021-07-16T04:19:27+5:30

सांगली : शहरातील गवळी गल्ली परिसरातील सोने पॉलिशच्या दुकानात आलेले ८२ हजार ५०० रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने ...

In Sangli, a foreign worker wears five weights of jewelery | सांगलीत परप्रांतीय कामगाराचा पाच तोळे दागिन्यांवर डल्ला

सांगलीत परप्रांतीय कामगाराचा पाच तोळे दागिन्यांवर डल्ला

सांगली : शहरातील गवळी गल्ली परिसरातील सोने पॉलिशच्या दुकानात आलेले ८२ हजार ५०० रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने कामगारानेच लंपास केले. याप्रकरणी दीपक ओमप्रकाश सोनी यांनी अत्तारअली अकबर शेख (वय ४५, रा. कोलकाता) या परप्रांतीय कामगाराविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादी सोनी यांचे गवळी गल्लीमध्ये सोने पॉलिशचे दुकान आहे. यात अत्तारअली शेख कामाला होता. सोमवारी तासगाव येथील व्यापाऱ्याने सोने पॉलिश करण्यासाठी पाच तोळे ६ ग्रॅम वजनाचे दागिने दिले होते. दुकानात कोणीही नसल्याचा फायदा घेत संशयित ८२ हजार ५०० रुपये किमतीचे ५ तोळे ६ ग्रॅम २३० मिलीग्रॅम वजनाचे दागिने घेऊन पसार झाला. मालक सोनी हे दुकानात आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी शहर पोलिसात शेख याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: In Sangli, a foreign worker wears five weights of jewelery