सांगलीत मनपा कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन, मनपा कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST2021-01-03T04:28:20+5:302021-01-03T04:28:20+5:30

वानलेसवाडी येथे महापालिका कर्मचाऱ्यांनी वानराच्या मृतदेहावर विधीवत अंत्यविधी केले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका कर्मचारी श्रीराम सासणे व ...

In Sangli, the employees of the corporation made a vision of humanity, the staff of the corporation made a vision of humanity | सांगलीत मनपा कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन, मनपा कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन

सांगलीत मनपा कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन, मनपा कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन

वानलेसवाडी येथे महापालिका कर्मचाऱ्यांनी वानराच्या मृतदेहावर विधीवत अंत्यविधी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका कर्मचारी श्रीराम सासणे व मुकादम नागेश मद्रासी यांनी माणुसकीचे दर्शन घडवित मृत वानराचा विधीवत अंत्यविधी केला. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता.

वानलेसवाडी येथे रस्त्याकडेला एका वाहनाला धडकून वानर गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण ते जगू शकले नाही. यावेळी ड्युटीवर निघालेले कर्मचारी श्रीराम सासणे यांच्या नजरेला हा प्रकार पडला. वानर मेल्याचे समजताच मुकादम नागेश मद्रासी यांना बोलावून घेतले. आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ निरीक्षक अविनाश पाटणकर, श्रीकांत मद्रासी, नगरसेविका व प्रभाग समितीचे सभापती अप्सरा वायदंडे यांनी वानराचा विधीवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वानलेसवाडीत हनुमान मंदिराच्या पिछाडीस विधी पूर्ण केले. गुलाल, हारफुलांनी त्याची छोटीशी अंत्ययात्रा काढली. खड्ड्यात दफन करुन फुले वाहिली. यावेळी महेंद्र वायदंडे, नितीन अवसरे, विशाल कांबळे, दादासाहेब कांबळे, विक्रम मुळके यांच्यासह नागरिक उपस्थित होते. एरव्ही माकडांना हाकलून लावणाऱ्या नागरिकांचे डोळेही अंत्यविधी पाहून अश्रूंनी डबडबले.

----------

Web Title: In Sangli, the employees of the corporation made a vision of humanity, the staff of the corporation made a vision of humanity