सांगली : राजेंद्र दर्डा यांच्याकडून कदम कुटुंबीयांचे सांत्वन, विश्वजीत कदम यांना दिला धीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 15:46 IST2018-03-16T15:37:08+5:302018-03-16T15:46:07+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांना शुक्रवारी माजी मंत्री व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदराजंली वाहिली. दर्डा यांनी सोनसळ (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे कदम कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वंन केले.

सांगली : राजेंद्र दर्डा यांच्याकडून कदम कुटुंबीयांचे सांत्वन, विश्वजीत कदम यांना दिला धीर
कडेगाव : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आमदार डॉ. पतंगराव कदम यांना शुक्रवारी माजी मंत्री व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदराजंली वाहिली. दर्डा यांनी सोनसळ (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे कदम कुटूंबियांची भेट घेऊन सात्वंन केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे कुलपती आमदार डॉ. पतंगराव कदम यांचे ९ मार्च रोजी निधन झाले. शुक्रवारी त्यांच्या सोनसळ या गावी काँग्रेसचे माजी मंत्री तथा लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी भेट दिली.
यावेळी त्यांनी पतंगराव कदम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पतंगरावांचे बंधू आमदार मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी कदम कुटुंबियांना धीर दिला.
पतंगराव कदम यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करीत १९९९ ते २०१४ या पंधरा वर्षांच्या काळात आमदार आणि मंत्री म्हणून कदम यांच्यासोबत काम करतानाच्या अनेक आठवणींना दर्डा यांनी उजाळा दिला.
त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राने एक दिलदार नेता गमावला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली .यावेळी लोकमतचे संपादक वसंत भोसले व वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख उपस्थित होते .