शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: परसबागेतल्या फळांनी घडविली गरिब विद्यार्थ्यांची सहल, नितीन नायक यांचा उपक्रम

By अविनाश कोळी | Updated: December 25, 2024 15:13 IST

सांगली : गरिबाघरच्या मुलांना शाळेची फी भरतानाच कसरत करावी लागते. अशा स्थितीत शिक्षणपूरक उपक्रमांसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न ...

सांगली : गरिबाघरच्या मुलांना शाळेची फी भरतानाच कसरत करावी लागते. अशा स्थितीत शिक्षणपूरक उपक्रमांसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबांना सतावतो. कुपवाड रोडवरील गरिब वस्तीतील मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेतलेल्या डॉ. नितीन नायक यांनी या मुलांच्या शाळेतील सहलीची फी भरण्यासाठी शक्कल लढविली. परसबागेत पिकलेली सेंद्रीय फळे त्यांनी विक्रीस काढली. त्यातून जमलेल्या पैशातून त्यांनी मुलांच्या सहलीचे पैसे भरले.कुपवाड ते बुधगाव रस्त्यावर वसलेल्या बाळकृष्ण नगर कापसे प्लॉटमधील तब्बल ४० मुलांची शिक्षणाची जबाबदारी भारती विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. नितीन नायक यांनी घेतली आहे. परिसरात हातावरचे पोट असलेली लोकवस्ती अधिक आहे. घरातले पुरुष व महिला दिवसभर मोलमजुरी करण्यासाठी जात असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक होते.मुलांच्या शिक्षणाची ही पडझड डॉ. नायक यांच्या लक्षात आली. त्यांनी आता त्यांना शिक्षणाच्या वाटेवरुन चालण्यास शिकविले. त्यांची फी भरणे, त्यांना शाळेत सोडणे, प्रसंगी अभ्यासात मदत करणे अशा सर्व गोष्टी ते करीत असतात. सध्या शाळांच्या स्नेहसंमेलनांचा व सहलींचा हंगाम आहे. याच वस्तीतल्या १२ मुलांना सहलीसाठी पैसे भरता येत नव्हते.नायक यांनी त्यांच्या बागेतील पपई, केळी, रामफळ काढून क्रेट भरुन घेतले. रिक्षातून त्यांनी बापट उद्यान गाठले. ‘सेंद्रीय फळे विक्रीस’ असा फलक झळकविला. नायक यांना ओळखणारे अनेकजण असल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली. हा शैक्षणिक उपक्रम आहे म्हटल्यावर सर्वांनी ही फळे घेतली. अर्ध्या तासात सर्व क्रेट रिकामे झाले. चार हजार रुपये त्यांना मिळाले.

शाळेत जाऊन फी भरलीपैसे मिळाल्यानंतर नायक यांनी थेट मुलांची शाळा गाठली. त्यांनी बारा मुलांच्या सहलीचे पैसे भरले. त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. नायक यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीfruitsफळेStudentविद्यार्थीSchoolशाळा