सांगलीच्या डॉक्टर विवाहितेचा राहुरीत छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:23+5:302021-06-29T04:19:23+5:30

सांगली : येथील माहेरवाशीण असलेल्या पण राहुरीत सासरी असलेल्या डॉक्टर विवाहितेचा माहेरहून मोटारीसाठी दहा लाख रुपये घेऊन येणाच्या मागणीसाठी ...

Sangli doctor tortures married woman in Rahuri | सांगलीच्या डॉक्टर विवाहितेचा राहुरीत छळ

सांगलीच्या डॉक्टर विवाहितेचा राहुरीत छळ

सांगली : येथील माहेरवाशीण असलेल्या पण राहुरीत सासरी असलेल्या डॉक्टर विवाहितेचा माहेरहून मोटारीसाठी दहा लाख रुपये घेऊन येणाच्या मागणीसाठी छळ करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी डॉ. सोनल अभिजित पद्माळकर (रा. सध्या गव्हर्नमेंट कॉलनी) यांनी येथील विश्रामबाग पोलिसांत सासरच्या मंडळींविरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार पती डॉ. अभिजित गौतम पद्माळकर, सासू सुलेखा गौतम पद्माळकर, दीर इंद्रजित, भावजई ज्योती, चुलत दीर सम्यक (सर्व, रा. राहुरी, जि. अहमदनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मार्च महिन्यात सांगलीतील डॉ. सोनल यांचा डॉ. अभिजीतशी विवाह झाला होता. लग्नानंतर ५ जूनपर्यंत सोनल सासरी होत्या. या कालावधीत नवीन मोटार घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावला होता. यावेळी संशयितांनी शिवीगाळ करून मानसिक छळ केला. सततच्या त्रासाला कंटाळून त्या माहेरी सांगलीत आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.

Web Title: Sangli doctor tortures married woman in Rahuri