शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
4
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
5
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
6
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
7
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
8
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
9
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
10
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
11
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
12
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
13
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
14
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
15
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
16
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
17
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
19
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
20
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार

सांगलीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी १ कोटीची भाऊबीज आली!; सेविका, मदतनिसांना प्रत्येकी किती रुपये मिळणार.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:33 IST

मंगळवारपासून खात्यात जमा होणार

सांगली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीजेपोटी १ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात तो मंगळवारपासून जमा केला जाणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना प्रत्येकी २००० रुपयांची भाऊबीज मिळणार आहे.दरवर्षी दिवाळीनंतरच भाऊबीज मिळते असा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे. पण यंदा मात्र दिवाळीपूर्वीच शासनाने पैसे देऊ केले आहेत. राज्य सरकारच्या अनेक योजना निधीअभावी रखडल्या असतानाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीजेसाठी मात्र तरतूद करण्याची तत्परता शासनाने दाखविली आहे. सांगली जिल्ह्यात २ हजार ७०३ अंगणवाडी सेविका आहेत, तर २ हजार २५० मदतनीस आहेत. एकूण ४ हजार ९५३ जणींच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा केले जाणार आहेत. एकूण ९९ लाख ६ हजार रुपयांची रक्कम मंगळवारपासून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण विभागात शुक्रवारी निधी वर्ग करण्याची प्रक्रिया गतीने सुरु होती. राज्यातील एक लाख १० हजारांहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना भाऊबीज देण्यात येत आहे. त्यासाठी ४० कोटी ६१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

भाऊबीज नको, बोनस द्यादरम्यान, अंगणवाडी कर्मचारी संघटनेने ‘आम्हाला भाऊबीज नको, बोनस द्या’ अशी मागणी केली होती. ‘२००० रुपयांची भेट नको, तर किमान एक वेतन बोनस म्हणून द्या’ अशी त्यांची मागणी होती. इतर सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळतो, मग अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बोनस का नाही? असा सवाल संघटनेने उपस्थित केला होता. पण शासनाने यंदा भाऊबीज वेळेत देऊन कर्मचाऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Anganwadi workers receive Diwali gift: ₹2000 each for Bhaubeej!

Web Summary : Sangli's Anganwadi workers receive ₹2000 each for Bhaubeej before Diwali. The government disbursed ₹1 crore for 4,953 workers. Unions demanded a bonus instead.