शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मानांकनात सांगली जिल्हा राज्यात तिसरा, विभागात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:55 IST

आटपाडी तालुका कोल्हापूर विभागात अव्वल, जत आणि वाळवा तालुकेही गुणवत्तापूर्ण कामगिरीत टॉपर

सांगली : आरोग्य संसाधन यंत्रणेमार्फत राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखालील आरोग्य संस्थांच्या मानांकनात सांगली जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. कोल्हापूर विभागात जिल्हा अग्रक्रमावर आहे.या सरकारी आरोग्य संस्थांंमध्ये विविध आरोग्य कार्यक्रम राबविले जातात. त्याचे निर्देशांक प्रत्येक महिन्याला जाहीर केले जातात. त्यानुसार डिसेंबर महिन्याच्या मानांकनात सांगलीने जोरदार यश मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील आरोग्य केंद्रांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यात तिसरा तर कोल्हापूर विभागीय परिमंडळात प्रथम क्रमांक पटकावत आरोग्यसेवेतील सांगलीची गुणवत्ता सिद्ध केली आहे.आटपाडी तालुक्याने तालुका आरोग्य अधिकारी मानांकनात कोल्हापूर परिमंडळ विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर जत, तासगाव व वाळवा तालुक्यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक पटकावला आहे.माता बालसंगोपन, आरोग्य व कुटुंब कल्याण, किशोरवयीन मुली, आरसीएच पोर्टल, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम, आरोग्य अभियान, एकात्मिक साथरोग सर्वेक्षण, प्रशासकीय कामकाज आदी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सांगली जिल्ह्याची कामगिरी लक्षणीय ठरल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामगिरीमुळेच ही आघाडी घेता आल्याचे ते म्हणाले.सामूहिक कामगिरीची फलश्रुतीजिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे आणि माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाभरात आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांपासून गावपातळवरील आशा कार्यकर्तीपर्यंतच्या प्रत्येक घटकाने आरोग्यसेवेत सहभाग दिला. या सामूहिक प्रयत्नांची फलश्रुती म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला राज्यपातळीवरील यशाला गवसणी घालता आली.

उत्तम प्राथमिक उपचारांसह सर्व राष्ट्रीय आरोग्य उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून यापुढेही कायम राहणार आहे. आटपाडी, वाळवा, जत तालुक्यांच्या कामगिरीनेही जिल्ह्याच्या आरोग्यसेवेच्याा गुणवत्तेवर शिक्कामोर्तब केले आहे. भविष्यात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख आरोग्यसेवा देण्याचा संकल्प आहे. - डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा आरोग्याधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli District Ranks Third in Maharashtra's Health Standards

Web Summary : Sangli district secured third place in Maharashtra for health standards, topping the Kolhapur division. Successful implementation of health programs and dedicated teamwork contributed to this achievement. Atpadi excelled among talukas. Dr. Wag attributed the success to collaborative efforts.