शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बालस्वास्थ्य कार्यक्रमात सांगली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 18:12 IST

स्मार्ट पीएचसी राज्यभर राबविणार

सांगली : बालस्वास्थ्य कार्यक्रमात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. याच गतीने आरोग्य विभागाने कामे करावीत. शासकीय रुग्णालयांत प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. जिल्हा परिषदेत सोमवारी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समितीच्या नियामक मंडळाच्या सभेत त्या बोलत होत्या.धोडमिसे म्हणाल्या, स्मार्ट पीएचसीच्या माध्यमातून माता व बालकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात २०२३-२४ या वर्षात २६१ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ४२५० अन्य शस्त्रक्रिया झाल्या. यामुळे जिल्हा राज्यात द्वितीय क्रमांकावर आला. तंबाखूमुक्त कार्यक्रमांतर्गत सर्व शैक्षणिक संस्था व आरोग्य संस्था तंबाखूमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य आहे. किशोरवयीन मुले व मुलींच्या शारीरिक व मानसिक समुपदेशनासाठी ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात मैत्री क्लिनिक सुरू केली आहेत. महाविद्यालयांमध्येही पौगंडावस्थेतील प्रश्नांचे व समस्यांचे समुपदेशकाद्वारे निराकरण करावे.आरोग्याधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी सांगितले की, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य व पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून तीन महिन्यांत १० हजार २० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कर्करोगाच्या सर्वाधिक म्हणजे ७९८५१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लोकसंख्येनुसार सांगली जिल्हा महात्मा फुले योजनेत प्रथम क्रमांकावर आहे. स्मार्ट पीएचसी हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सांगली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदलासाठी व्हिजन सांगली उपक्रम राबविण्यात येणार आहे.सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. शिवाजी आलदार, आदी उपस्थित होते.

आरोग्य केंद्रांना पारितोषिके देणारधोडमिसे यांनी सांगितले की, आरोग्य उपक्रमांच्या १११ कार्यक्रम निर्देशांकात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

इस्लामपूर रुग्णालयाचे अभिनंदनइस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाने कायाकल्प कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.

टॅग्स :SangliसांगलीHealthआरोग्य