शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

रेमडेसिविर इंजेक्शनबाबत सांगली जिल्हा टंचाईच्या काठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 5:06 PM

CroanVirus Sangli: कोरोना रुग्णांसाठी गरजेचे ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या बाबतीत जिल्ह्याची स्थिती काठावरचीच आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत सुमारे १ हजार ४०० इंजेक्शन्स उपलब्ध होती. जिल्ह्याची दररोजची गरज सरासरी ७५० इंजेक्शन्स इतकी आहे.

ठळक मुद्देरेमडेसिविर इंजेक्शनबाबत सांगली जिल्हा टंचाईच्या काठावर दररोजची गरज सरासरी ७५० इंजेक्शन्स इतकी

सांगली : कोरोना रुग्णांसाठी गरजेचे ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या बाबतीत जिल्ह्याची स्थिती काठावरचीच आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत सुमारे १ हजार ४०० इंजेक्शन्स उपलब्ध होती. जिल्ह्याची दररोजची गरज सरासरी ७५० इंजेक्शन्स इतकी आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दररोजच सरासरी १०० ने वाढत आहे. त्यातील गंभीर रुग्णांना रेमडेसिविर दिले जाते. मिरज कोविड रुग्णालयासह सर्व कोविड रुग्णालयांत दररोज सरासरी ७५० इंजेक्शन्स वापरली जातात. जिल्ह्याला विविध सहा कंपन्यांची इंजेक्शन्स पुण्याहून पुरविली जातात. साठा आणि वितरणावर अन्न व अ‍ौषध प्रशासनाचे नियंत्रण आहे. मिरज कोविड रुग्णालयाला थेट शासनाकडून पुरवठा होतो, तर अन्य रुग्णालयांसाठी कंपन्या पुरवतात. या सर्वांची नोंद अन्न व अ‍ौषध प्रशासनाकडे होते.या नोंदीनुसार मिरज कोविड रुग्णालयाकडे बुधवारी संध्याकाळपर्यंत ८८० इंजेक्शन्स उपलब्ध होती. अन्य कोविड रुग्णालयांमधील अ‍ौषध दुकानांत ५५० इंजेक्शन्सचा साठा होता. गुरुवारी किंवा शुक्रवारपर्यंत हा साठा संपण्याची शक्यता आहे. नवा पुरवठा शुक्रवारी होणार असल्याची माहिती अन्न व अ‍ौषध प्रशासनाने दिली. यदाकदाचित तो लांबला तर मात्र आणिबाणीची स्थिती निर्माण होऊ शकते.मंगळवारी पाडवा व बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सुट्ट्यांमुळे रेमडेसिविरचा पुरवठा दोन दिवस होऊ शकला नाही, त्यामुळे टंचाईस्थिती निर्माण झाली. गुरुवारी जिल्ह्यातील सर्व कोेविड रुग्णालयांत इंजेक्शन उपलब्ध असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. थेट औषध दुकानांमधून विक्रीस मनाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन भांडारकर व निरिक्षक विकास पाटील वितरणावर नियंत्रण ठेवत आहेत.

रेमडेसिविरचा दोन दिवसांपुरता साठा उपलब्ध आहे. आणखी मागणी केली आहे. शुक्रवारी पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. सध्यातरी जिल्ह्यात कोठेही टंचाई नाही. सर्व कोविड रुग्णालयांत उपलब्ध आहेत.- विकास पाटील,निरिक्षक, अन्न व अ‍ौषध प्रशासन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmedicineऔषधंSangliसांगली