शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
3
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
4
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
5
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
6
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
7
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
8
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
9
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
11
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
12
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
13
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
14
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
15
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
17
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
18
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
19
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
20
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?

सांगली जिल्हा बँक १० हजार कोटी ठेवींचा टप्पा ओलांडणार, मार्चअखेर नेट एनपीए शून्य टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 14:40 IST

ग्रॉस एनपीए ५ टक्क्यांच्या आत असेल

सांगली : जिल्हा बँकेची सुरुवात २८ मार्च १९२७ मध्ये पाच हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू झाली होती. अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकाऱ्यांच्या पारदर्शक कारभारामुळे जिल्हा बँकेने आठ हजार २७५ कोटी रुपये ठेवींचा टप्पा पार केला असून, पुढील आर्थिक वर्षात १० हजार कोटी ठेवींचा टप्पा पार करणार आहे, असा विश्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. तसेच, बँकेचा मार्चअखेर नेट एनपीए शून्य टक्के, तर ग्रॉस एनपीए ५ टक्क्यांच्या आत ठेवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.मानसिंगराव नाईक म्हणाले, जिल्हा बँकेची स्थापना सांगलीचे पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी पाच हजार रुपयांच्या भांडवलावर केली होती. पुढे अनेक मान्यवरांच्या प्रयत्नामुळे गेल्या ९८ वर्षांत बँकेन स्वत:चे भाग भांडवल १९० कोटी केले आहे. तसेच, आठ हजार २७५ रुपयांच्या ठेवी केल्या असून, सात हजार २०० कोटी रुपयांची कर्ज वाटप केले आहेत. १५ हजार ५०० कोटींचा वार्षिक व्यवसाय होत आहे. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे.

बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के, तर ग्रॉस एनपीए ७.५० टक्के झाला आहे. पुढील आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी १० हजार कोटींवर आणि नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात येणार आहे. ग्रॉस एनपीए ५ टक्क्यांच्या आत आणण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा बँकेच्या नवीन १० शाखांना रिझर्व बँकेन मंजुरी दिल्यामुळे २२८ शाखा झाल्या आहेत. जिल्हा बँके आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास माजी मंत्री जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकांची प्रामाणिक कामगिरी कारणीभूत आहे.

पशुपालनासाठी बिनव्याजी तीन लाखांपर्यंत कर्जशेळ्या, मेंढ्या, कोंबडी व गाई, म्हशी पशुपालनासाठी पशुपालकांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार आहे. दि. १ एप्रिल २०२५ पासून योजनेची अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

मार्च २०२६ मध्ये बँकेचे शतक महोत्सव वर्षजिल्हा बँकेची स्थापना २८ मार्च १९२७ मध्ये झाली असून, बँकेने ९९ वर्षांत पदार्पण केले आहे. मार्च २०२६ मध्ये बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षाला प्रारंभ होणार आहे. यानिमित्त देशपातळीवरील बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलवून वर्षभर महिन्याला एक कार्यक्रम करण्याचे नियोजन आहे, असेही मानसिंगराव नाईक व वाघ यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक