शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : म्हैसाळच्या आवर्तनावेळी कॉंग्रेस-भाजप नेत्यांत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 14:28 IST

अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला मुहूर्त मिळाला, मात्र आवर्तनाच्या प्रारंभालाच उद्घाटनाच्या उपस्थितीवरून भाजप व कॉंग्रेस नेत्यांमध्ये जुंपली. कॉंग्रेस नेते अनिल आमटवणे व भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात जोरदार वादावादी व शिवीगाळचा प्रकार घडला.

ठळक मुद्देम्हैसाळच्या आवर्तनावेळी कॉंग्रेस-भाजप नेत्यांत जुंपलीम्हैसाळमधील प्रकार : अनिल आमटवणे- दिनकर भोसलेंमध्ये वादावादी

सांगली/म्हैसाळ : अखेर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला मुहूर्त मिळाला, मात्र आवर्तनाच्या प्रारंभालाच उद्घाटनाच्या उपस्थितीवरून भाजप व कॉंग्रेस नेत्यांमध्ये जुंपली. कॉंग्रेस नेते अनिल आमटवणे व भाजपचे तालुका अध्यक्ष दिनकर भोसले यांच्यात जोरदार वादावादी व शिवीगाळचा प्रकार घडला.म्हैसाळ योजनेवरून गेले काही महिने कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य पक्षीयांचे आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना या गोष्टीची दखल घेत योजना सुरू करावी लागली. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर योजनेचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरू झाला.

योजनेच्या वीजपुरवठ्याच्या बटणाची कळ दाबून योजना सुरू करण्यासाठी कॉंग्रेस, भाजपचे नेते, कार्यकर्ते शनिवारी म्हैसाळ येथील पंपगृहाजवळ जमले होते. कळ दाबण्यावेळीच राजकीय कळ दाबली गेल्याने दोन्ही पक्षांचे नेते व समर्थक आमने-सामने झाले. एकमेकांच्या अंगावर धावून जाताना शिवीगाळही करण्यात आली.

शनिवारी सकाळी भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आ. सुरेश खाडे, मिरज पंचायत समितीच्या सभापती जनाबाई पाटील, उपसभापती काकासो धामणे, बाजार समिती सभापती दिनकर पाटील, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती अरुण राजमाने, पंचायत समिती सदस्य दिलीप पाटील, भाजपचे मिरज तालुका अध्यक्ष दिनकर भोसले, कॉंग्रेसचे नेते अनिल आमटवणे, भाजपचे धनंजय कुलकर्णी, अशोक वडर उपस्थित होते.संजयकाका पाटील आणि आ. खाडे यांच्याहस्ते कळ दाबून योजनेच्या आवर्तनाला सुरुवात करण्यात येणार होती. त्यावेळी अनिल आमटवणे त्याठिकाणी पुढे येत असताना दिनकर भोसले यांनी त्यांना हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमटवणे यांनी या प्रकाराबद्दल त्यांना जाब विचारला. हा वाद वाढत गेला.

दोन्ही नेते व त्यांचे समर्थक आक्रमक झाले. एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत भांडण वाढले. शेवटी खासदार पाटील यांना या भांडणात मध्यस्थी करावी लागली. त्यांनी हे भांडण अखेर सोडविले आणि योजनेची कळ दाबून आवर्तनास सुरुवात केली. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, जी. व्ही. खाडे, एस. एम. नलावडे, जी. टी. वाकुर्डे, एम. आर. जाधव, एस. व्ही. पुजारी, एन. एच. चौगुले, चंद्रकांत कोळी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणDamधरणBJPभाजपाcongressकाँग्रेस