शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
3
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
4
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
5
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
6
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
7
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
8
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
9
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
10
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
11
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
12
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
13
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
14
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
15
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
16
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...
17
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
18
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
19
“ज्योतीला फसवले जातेय, सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला १५-२०-२५ हजार कमावते”; वडिलांचा दावा
20
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट

सांगली : काँग्रेसमध्ये जुंपली; भाजपने उरकले उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 01:10 IST

सांगली : येथील सह्याद्रीनगरमधील जवाहर हौसिंग सोसायटी ते कुपवाड फाटा या १०० फुटी जुना कुपवाड रस्त्याच्या कामावरून सोमवारी काँग्रेसच्या ...

ठळक मुद्देजुना कुपवाड रस्त्याच्या उद्घाटनाचा वाद नगरसेवकांसह नागरिकांत हाणामारी, रस्त्याच्या कामाला विरोध

सांगली : येथील सह्याद्रीनगरमधील जवाहर हौसिंग सोसायटी ते कुपवाड फाटा या १०० फुटी जुना कुपवाड रस्त्याच्या कामावरून सोमवारी काँग्रेसच्या नगरसेवकांतच जुंपली. दोन्ही नगरसेवकांचे गट आमने-सामने आल्याने परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. रस्त्याच्या कामाला विरोध करीत बारुदवाले गटाने जेसीबीसमोरच ठाण मांडले. यातून काँग्रेस समर्थकांतच जोरदार वादावादी होऊन नागरिकांत हाणामारीही झाली. एकीकडे काँग्रेसचा गोंधळ सुरू असताना, दुसरीकडे भाजपने मात्र रस्त्याच्या कामाचे उद््घाटन उरकून काँग्रेसवर कडी केली.

सह्याद्रीनगर येथील शंभरफुटी जुना कुपवाड रस्त्याच्या कामावरून गेल्या तीन वर्षापासून वाद सुरू आहे. या रस्त्याचे काम करण्यास काही नागरिकांमधून विरोध सुरू होता. येथील ४२ मालमत्ताधारकांनी नुकसानभरपाई मिळावी, यासाठी न्यायालयात दावाही दाखल केला होता.चार दिवसांपूर्वी या नागरिकांनी हा दावा मागे घेतला आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना नगरसेवक संतोष पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद केली होती. पण न्यायालयीन वादामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. अखेर संबंधित मालमत्ताधारकांनी दावा मागे घेतल्याने सोमवारपासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार होते. काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील हे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करीत असताना, या प्रभागातील भाजपच्या अतुल माने, सुशील हडदरे यांनीही नेत्यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाच्या उद््घाटनाचा कार्यक्रम निश्चित केला होता.

सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी ठेकेदार जेसीबीसह आला असताना काँग्रेसच्या नगरसेविका मदिना बारूदवाले यांचे पती ईलाही बारूदवाले हे समर्थकांसह तेथे आले. त्यांनी, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने रस्त्याचे काम सुरू करण्यास विरोध केला. बारुदवाले समर्थकांनी जेसीबीसमोरच ठाण मांडले. याचवेळी नगरसेवक संतोष पाटील यांचे समर्थक जमा झाले.

दोन्ही गट आमने-सामने आल्याने जोरदार वादावादी झाली. दोन्ही बाजूचे लोक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तणाव वाढू लागताच विश्रामबाग पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांसमोरच दोन्ही गटातील तरुण पुन्हा भिडले. अखेर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले. महापालिकेचे उपअभियंता सतीश सावंत यांनाही घटनास्थळी बोलाविण्यात आले. सावंत यांनी, सध्या रस्त्याच्या कामासाठी न्यायालयीन स्थगिती नसल्याने काम सुरू केल्याचा खुलासा केला.

अखेर पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.दरम्यान, काँग्रेस नगरसेवक रस्त्याच्या कामावरून एकमेकांविरुद्ध भिडले असतानाच, महापालिकेतील सत्ताधारी भाजपने मात्र या कामाचे उद््घाटन थाटामाटात केले. आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर, माजी आमदार दिनकर पाटील, युवा नेते अतुल माने, सुशील हडदरे, विजय हिर्लेकर आदींच्या उपस्थितीत भाजपने संधी साधून उद््घाटनाचे सोपस्कार पूर्ण केले.महापालिकेकडून दुर्लक्ष : विजय हडदरेसामाजिक कार्यकर्ते सुशील हडदरे म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते विजय हेर्लेकर या रस्त्यासाठी कार्यरत होते. वास्तविक न्यायालयात महापालिकेने जाणीवपूर्वक उपस्थित न राहता रस्त्याचा ताबा अडचणीत आणला होता. परंतु हेर्लेकर व मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर न्यायालयात प्रशासन हजर झाले. त्यानुसार महापालिकेच्याविरोधात असलेल्या याचिकाकर्त्यांनी दावाही मागे घेतला. त्याचा आज मुहूर्त होत आहे. 

जुना कुपवाड रस्त्यावर न्यायालयीन लढा संपलेला नसताना, स्थानिक नगरसेवकाने दंडुकशाही व पोलीस बळाचा वापर करून जबरदस्तीने काम सुरू केले आहे. जागेची नुकसानभरपाई अद्याप नागरिकांना मिळालेली नाही. आमचा न्यायालयीन लढा सुरूच राहील.- ईलाही बादरुवाले, माजी नगरसेवकजुना कुपवाड रस्त्याच्या कामासाठी स्थायी समिती सभापती असताना १ कोटी ४० लाख रुपयांची तरतदू करून निविदा काढली होती, पण न्यायालयीन वादामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता वाद संपल्यानंतर ठेकेदारने काम सुरू करावे, यासाठी पाठपुरावा केला. मी कधीच श्रेयासाठी काम करीत नाही. माझ्या कामाचे उद््घाटन आमदार, महापौरांच्याहस्ते झाले, हेही काही कमी नाही.- संतोष पाटील, नगरसेवक काँग्रेसराजकारणविरहीत भागाचा विकास झाला पाहिजे. पण ज्यांनी या रस्त्याच्या कामात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. रस्ता होऊ नये अशी व्यवस्था केली, ते नगरसेवक आज रस्त्याचे काम होत असताना खोटे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात त्यांचे योगदान काय?- अतुल माने भाजप युवा नेते 

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाBJPभाजपाcongressकाँग्रेस