सांगली :उंटाने भाजपचा तंबू उचललाच : संभाजी पवार, पाच वर्षापूर्वीचे माझे संकेत ठरले खरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:24 IST2019-01-12T15:01:09+5:302019-01-12T15:24:03+5:30
पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी मी संजयकाका पाटील यांच्याबाबत दिलेले संकेत खरे ठरत आहेत. उंटाला तंबूत घेऊ नका असे बजावले होते, आता उंटाने भाजपचा तंबू उचलल्याची प्रचिती भाजप नेत्यांना आली आहे, असे प्रतिपादन शनिवारी माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

सांगली :उंटाने भाजपचा तंबू उचललाच : संभाजी पवार, पाच वर्षापूर्वीचे माझे संकेत ठरले खरे
सांगली : पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी मी संजयकाका पाटील यांच्याबाबत दिलेले संकेत खरे ठरत आहेत. उंटाला तंबूत घेऊ नका असे बजावले होते, आता उंटाने भाजपचा तंबू उचलल्याची प्रचिती भाजप नेत्यांना आली आहे, असे प्रतिपादन शनिवारी माजी आमदार संभाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
ते म्हणाले, सध्या सुरू असलेले राजकारण तत्वहीन आहे. इतके घाणेरडे राजकारण मी कधी पाहिले नाही. केवळ आकडे दाखवून विकासकामांचे नाटक सुरु आहे. हजारो कोटीच्या निधीची जाहिरातबाजी केली, मग निधी कुठे गेला, असा सवाल त्यांनी केला.
आगामी निवडणुकांमध्ये काय भूमिका घ्यायची याचा निर्णय समकालीन राजकीय, सामाजिक मित्र, समर्थकांशी चर्चा करुन जाहीर करू.