शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: कॉंग्रेसला शह देण्यासाठी भाजपाचा बुधवारी काळा पैसा विरोधी दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 13:48 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वर्षश्राद्ध ८ नोव्हेंबरला घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीत भाजपच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याचदिवशी कॉंग्रेसला शह देण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वर्षश्राद्ध ८ नोव्हेंबरला घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीत भाजपच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याचदिवशी कॉंग्रेसला शह देण्यासाठी काळा पैसा विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा दिन साजरा करण्याचे आवाहन प्रदेश संघटनमंत्री रवी अनासपुरे यांनी पदाधिका-यांना केले. येथील टिळक स्मारक मंदिरात भाजपच्या शहर व जिल्हा कार्यकारिणीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आंदोलनांबाबत संताप व्यक्त करण्यात आला. दोन्ही पक्षांकडून होत असलेल्या सरकारच्या बदनामीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. पदाधिकारी आणि नेत्यांनी विरोधकांवर टीकाही केली. यावेळी अनासपुरे म्हणाले की, सरकारला जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीत बदनाम करण्याचा प्रयत्न कॉँग्रेस-राष्ट्रवादीकडून सुरू आहे, मात्र जनता त्यांना भूलणार नाही. नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती ते नकारात्मक पद्धतीने साजरी करणार असतील, तर आपण ती सकारात्मक पद्धतीने साजरी करायला हवी. यादिवशी सर्वांनी काळा पैसा विरोधी दिन साजरा करावा. खासदार संजय पाटील म्हणाले, नांदेडची निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसला दहा हत्तीचे बळ आल्याचे वाटत आहे. हा त्यांचा भ्रम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. ८ नोव्हेंबरला ते आक्रोश करणार आहेत. ते सध्या हवेतच वावरत आहेत. भाजपने धोरणात्मक मुद्यांना हात घातल्यास त्यांची हवा निघून जाईल.प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे म्हणाले, नोटाबंदीमुळे ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांची अडचण झाली. अशाा लोकांचा सरकारविरोधी रोष व्यक्त होणे स्वाभाविक होते. जनआक्रोशच्या नावाखाली असाच रोष आता काळे पैसेवाले व्यक्त करणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्षाकडून ८ नोव्हेंबरला काळा पैसाविरोधी दिन साजरा केला जाईल. ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांचे ९ नोव्हेंबरला काळ्या पैशाविरोधात मार्गदर्शन होणार आहे. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, भाजप जाहिरात करण्यात आघाडीवर असल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादी करते. पण केलेल्या विकासकामांच्याच जाहिराती आहेत. त्यात खोटे काय? याची जाणीव त्यांना करुन द्यायला हवी. बदनामी खपवून घेतली जाणार नाही. या बैठकीला आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार दिनकर पाटील, भगवानराव साळुंखे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, गोपीचंद पडळकर, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजाराम गरुड, दीपक शिंदे-म्हैसाळकर, रणधीर नाईक, वैभव शिंदे आदी उपस्थित होते.महापालिका क्षेत्रातील संस्थांची चौकशी करा!माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, महापलिका क्षेत्रातील सहकारी संस्थांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. या संस्थांमधील भ्रष्टाचाराबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. निवडणुकीपूर्वी सहकारी संस्थांची चौकशी लावण्यात यावी. याबाबत भाजप नेत्यांनी गांभीर्याने घेतल्यास निवडणूक सोपी जाईल. प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर म्हणाल्या, आतापासूनच महापालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू करायला हवी. संजयकाका-घोरपडे शेजारी-शेजारीगेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांपासून फटकून वागत असलेले भाजप नेते संजयकाका पाटील आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे शनिवारी बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले. व्यासपीठावर ते दोघेही शेजारी-शेजारी बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

टॅग्स :SangliसांगलीBJPभाजपाNote Banनोटाबंदीblack moneyब्लॅक मनी