शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सांगली बनली तुंबईनगरी :शहरातील ३ हजार घरात पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 12:37 IST

rain, sanglinews मुसळधार पावसामुळे शहर आणि उपनगरातील तीन हजार घरात पाण्याने वेढा दिला. शेकडो घरात पाणी शिरले. शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. नैसर्गिक नाले तुंबल्याने उपनगरातील नागरिकांना पुरस्थितीचा अनुभव आला. महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडनीस यांच्यासह महापालिकेच्या यंत्रणेने पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या होत्या.

ठळक मुद्देसांगली बनली तुंबईनगरी :शहरातील ३ हजार घरात पाणी शिरले रस्ते पाण्याखाली, वाहतुकीची कोंडी

सांगली : मुसळधार पावसामुळे शहर आणि उपनगरातील तीन हजार घरात पाण्याने वेढा दिला. शेकडो घरात पाणी शिरले. शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी झाली. नैसर्गिक नाले तुंबल्याने उपनगरातील नागरिकांना पुरस्थितीचा अनुभव आला. महापौर गीता सुतार, आयुक्त नितीन कापडनीस यांच्यासह महापालिकेच्या यंत्रणेने पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या होत्या.दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने शहरासह उपनगराची दैना उडाली होती. कुुपवाडचा चैत्रबन नाला तुंडुब भरून वाहत होता. त्यामुळे वारणाली, मंगलमूर्ती कॉलनी, आनंदनगर, तुळजाईनगर,ज्ञानेश्वर कॉलनी परिसरातील जवळपास १०० हून अधिक घरे पाण्यामध्ये होती.

लक्ष्मीमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी वाहत होते. काही काळ या रस्त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. शिंदे मळा येथील रेल्वे पुलाखाली तर गुडघाभर पाणी होते. मिरा हौसिंग सोसायटीतही पावसाचे पाणी शिरले होते. बायपास रस्ता ते मल्टीपेक्सकडे जाणाऱ्या रस्ता वाहतुकीसाठी बंद होता.शामरावनगर परिसरातील अनमोल कॉलनी, देवेंद्र सोसायटी, महसूल कॉलनी, आदित्य कॉलनी, जनता बँक कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, रॉयल कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, कालिकानगर, रुक्मिणीनगर परिसरातील १५०० घरांमध्ये पाणी शिरले आहे. नगरसेवक अभिजित भोसले, नसिमा नाईक, रज्जाक नाईक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप दळवी आदी नागरिकांच्या मदतीला धावले होते.

भोसले यांनी आयुक्त नितीन कापडनीस यांच्यासमोर परिस्थितीचा पंचनामा केला. वालनेसवाडी, गव्हर्मेंट कॉलनी, विजयनगर पुलासह अनेक भागात पाणी तुंंबल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. जुना बुधगाव रस्ता, पंचशीलनगर, शिंदे मळा, रेपे प्लॉट, वाल्मिकीमध्ये आवास परिसरातील घरांना पाण्याने वेढा दिला होता.पाण्याखालील परिसर, कॉलनीशामरावनगर, सह्याद्रीनगर, शिंदे मळा, भीमनगर, मीरा हौसिंग सोसायटी, तुळजाईनगर, वारणाली, हडको कॉलनी, कालिकानगर, शांतीनाथ कॉलनीपाण्याखालील रस्ते :- बायपास ते मल्टीपेक्स, रेल्वे पुल ते अहिल्यादेवी होळकर चौक, लक्ष्मी मंदिर ते विश्रामबाग उड्डाणपुल, शामरावनगरमधील बहुतांश रस्ते, मंगळवार बाजार ते अहिल्यादेवी होळकर चौक

टॅग्स :RainपाऊसSangliसांगली