शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

सांगली व कोल्हापूर महापालिका हद्दीतील एलबीटी असेसमेंटविरुद्ध लढाई सुरू ठेवणार : समीर शहा, शासनाने स्थगिती कायम ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:48 IST

सांगली व कोल्हापूर महापालिका हद्दीतील एलबीटी वसुलीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असली तरी, ही स्थगिती कायमस्वरुपी द्यावी, व्यापाऱ्यांची असेसमेंट रद्द करावी, यासाठी लढा सुरूच ठेवणार, असे व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले.

ठळक मुद्देसांगली-कोल्हापूर महापालिका हद्दीतील एलबीटीविरोधात व्यापारी एकता असोसिएशनने केला संघर्ष एलबीटी वसुलीला कायमस्वरुपी स्थगिती द्यावी यासाठी लढा सुरूच ठेवणार :शहा

सांगली : सांगली व कोल्हापूर महापालिका हद्दीतील एलबीटी वसुलीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असली तरी, ही स्थगिती कायमस्वरुपी द्यावी, व्यापाऱ्यांची असेसमेंट रद्द करावी, यासाठी लढा सुरूच ठेवणार, असे व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले.शहा म्हणाले, गेली दोन वर्षे एलबीटीविरोधात व्यापारी एकता असोसिएशनने संघर्ष केला आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनाही व्यापाऱ्यांची असेसमेंट रद्द करावीत, सीए पॅनेल रद्द करावे, यासाठी वारंवार पाठपुरावा केला.

सत्ताधाऱ्यांचे नेते मदनभाऊ पाटील यांनी दिलेला शब्द पाळावा इतकीच व्यापाऱ्यांची अपेक्षा होती; पण याची कोणतीही दखल पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही. उलट व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. एकतर्फी निर्धारण करून लाखो रुपयांच्या नोटिसा देऊन व्यापाऱ्यांत दहशत निर्माण केली.आ. सुधीर गाडगीळ यांनीही सुरुवातीला फारसे लक्ष घातले नव्हते, पण शेखर इनामदार यांनी मध्यस्थी करून आ. गाडगीळ व संघटनेची बैठक घडविली. यावेळी व्यापाऱ्यांची छळवणूक, सीए पॅनेलचा घोटाळा, चुकीच्या असेसमेंटचे पुरावेच दिले.

दोन दिवसांपूर्वी आ. गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सांगलीतील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एलबीटी वसुली व कार्यवाहीला स्थगितीचे आदेश दिले आहे.

ही स्थगिती कायमस्वरुपी रहावी, यासाठी पाठपुरावा करणार आहोत. अभय योजनेतील असेसमेंट रद्द कराव्यात, सीए पॅनेल रद्द करावेत, यासाठी लढा सुरूच राहिल.यावेळी सुरेश पटेल, मुकेश चावला, सोनेश बाफना, सुदर्शन माने, धीरेन शहा उपस्थित होते.

टॅग्स :TaxकरSangliसांगलीkolhapurकोल्हापूर