सांगलीतील व्यापाऱ्यांचे बेमुदत उपोषण

By admin | Published: February 16, 2017 05:57 PM2017-02-16T17:57:19+5:302017-02-16T17:57:19+5:30

एलबीटी असेसमेंट तपासणी व सीए पॅनेल रद्द करण्यासाठी गुरुवारपासून सांगलीतील व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात

The incessant fasting of the traders of Sangli | सांगलीतील व्यापाऱ्यांचे बेमुदत उपोषण

सांगलीतील व्यापाऱ्यांचे बेमुदत उपोषण

Next

 ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 16  : एलबीटी असेसमेंट तपासणी व सीए पॅनेल रद्द  करण्यासाठी गुरुवारपासून सांगलीतील व्यापाऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. तत्पूर्वी व्यापारी व उद्योजकांनी शहरातून मोटारसायकली रॅलीही काढली. या निमित्ताने पुकारलेल्या सांगली बंदलाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. राज्य शासनाकडून लेखी हमी मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही व्यापारी संघटनेचे नेते समीर शहा यांनी दिला. 

सांगलीत व्यापारी एकता असोसिएशन, चेंबर आॅफ कॉमर्स, वसंतदादा, मिरज व गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत या संघटनांनी एलबीटीविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. अभय योजनेतील असेसमेंट तपासणी व सीए पॅनेल रद्द करावे, व्यापाºयांना बजाविलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात आदि मागण्यांसाठी महापालिकेला १५ दिवसाची डेडलाईनही देण्यात आली होती. ही डेडलाईन संपताच गुरुवारी व्यापारी व उद्योजकांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

Web Title: The incessant fasting of the traders of Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.