शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : एजंट परदेशात पळून जाण्याच्या तयारीत; हज यात्रेकरु हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:50 IST

हज यात्रेकरूंच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी एजंट हा यात्रेकरुंची रक्कम परत देण्याची बतावणी करीत परदेशात पलायनाच्या तयारीत असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. त्यामुळे हवालदिल यात्रेकरूंनी त्या एजंटाचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. फसवणूक झालेले यात्रेकरू पोलीस ठाण्यात दररोज चकरा मारत आहेत.

ठळक मुद्देएजंट परदेशात पळून जाण्याच्या तयारीत; हज यात्रेकरु हवालदिल हज यात्रेकरू फसवणूक प्रकरण, यात्रेकरु हवालदिल

मिरज : हज यात्रेकरूंच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी एजंट हा यात्रेकरुंची रक्कम परत देण्याची बतावणी करीत परदेशात पलायनाच्या तयारीत असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. त्यामुळे हवालदिल यात्रेकरूंनी त्या एजंटाचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. फसवणूक झालेले यात्रेकरू पोलीस ठाण्यात दररोज चकरा मारत आहेत.इरफान नामक एजंटाने शहरात टुर्स अ‍ॅँँड ट्रॅव्हल्सचे दुकान थाटून मुंबईतील एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून अनेक हज यात्रेकरूंकडून प्रत्येकी अडीच लाख याप्रमाणे सुमारे तीन कोटींची रक्कम घेतली. यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील यात्रेकरुंचा समावेश आहे.

यात्रेकरूंचा व्हिसा न आल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. यात्रेकरुंनी पोलिसात धाव घेतल्यानंतर ट्रॅव्हल्सचा संचालक व एजंट इरफान हे जबाबदारी एकमेकांच्या अंगावर ढकलत असल्याने, यात्रेकरु संभ्रमात आहेत.गेल्या काही दिवसांपासून हा घोळ सुरु असताना, एजंटाने यात्रेकरूंची रक्कम परत देण्याची तयारी दाखवत काही जणांना धनादेश दिले. मात्र एजंट इरफान याचे आखाती देशात नातेवाईक असल्याने, पोलीस कारवाई आणि यात्रेकरुंचा तगादा चुकविण्यासाठी तो परदेशात पळून जाणार असल्याच्या संशयावरुन त्याचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी यात्रेकरूंनी केली आहे.दरम्यान, रक्कम बुडण्याच्या भीतीने यात्रेकरु हवालदिल आहेत. एजंटाने यात्रेकरूंची रक्कम परत न दिल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Crimeगुन्हाSangliसांगलीPoliceपोलिस