सांगली : जिल्ह्यात ७०.८४ टक्के मतदान
By Admin | Updated: October 16, 2014 00:48 IST2014-10-16T00:28:13+5:302014-10-16T00:48:31+5:30
१०७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद : पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये चुरस

सांगली : जिल्ह्यात ७०.८४ टक्के मतदान
सांगली : तुल्यबळ उमेदवार व बहुरंगी लढतींमुळे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत आज, बुधवारी चुरशीने ७०. ८४ टक्के मतदान झाले. पलूस-कडेगाव व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघांत सर्वाधिक चुरस दिसली. १०७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद झाले असून, येत्या १९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
सहा माजी मंत्र्यांसह दिग्गज उमेदवार मैदानात असल्यामुळे जिल्ह्यातील लढती लक्षवेधी ठरल्या. सर्वच मतदारसंघांत तिरंगी, चौरंगी, पंचरंगी व बहुरंगी लढती असल्यामुळे मतदानही तितक्याच चुरशीने झाले. पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघांत सर्वाधिक चुरस दिसून आली. मतदान केंद्रांवर रांगा नसल्या, तरी मतदानाचा आकडा तासागणिक वाढत होता. ग्रामीण भागात सकाळी आणि सायंकाळी मतदानाचे प्रमाण अधिक होते. पलूस-कडेगाव येथे मतदारांना केंद्रांवर आणण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ दिसत होती. वसगडे (ता. पलूस) येथे एका बूथवर आॅनलाईन मतदार यादी तपासण्याचे काम सुरू होते. मात्र, याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. काही काळ तणावाचे वातावरण होते. याच मतदारसंघातील सांडगेवाडीत मतदानयंत्र बंद पडले होते; मात्र ते तत्काळ बदलण्यात आले. कवठेमहांकाळ शहरात विद्यानगर येथील महांकाली हायस्कूलवरील बूथ क्रमांक १६ व १७ वर मतदान सुरू असताना, रस्त्यावरच आर. आर. पाटील व अजितराव घोरपडे समर्थकांत वादावादीची घटना घडली. यावेळी पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद कवठेमहांकाळ पोलिसांत घोरपडे समर्थक राजू घाडगे यांनी दिली. या घटनांवरून मतदारसंघातील चुरस स्पष्टपणे दिसून आली.
पलूस-कडेगाव व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघांत सर्वाधिक चुरस दिसली. १०७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद झाले असून, येत्या १९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सहा माजी मंत्र्यांसह दिग्गज उमेदवार मैदानात असल्यामुळे जिल्ह्यातील लढती लक्षवेधी ठरल्या. सर्वच मतदारसंघांत तिरंगी, चौरंगी, पंचरंगी व बहुरंगी लढती असल्यामुळे मतदानही तितक्याच चुरशीने झाले. पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघांत सर्वाधिक चुरस दिसून आली. मतदान केंद्रांवर रांगा नसल्या, तरी मतदानाचा आकडा तासागणिक वाढत होता. ग्रामीण भागात सकाळी आणि सायंकाळी मतदानाचे प्रमाण अधिक होते. पलूस-कडेगाव येथे मतदारांना केंद्रांवर आणण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ दिसत होती. वसगडे (ता. पलूस) येथे एका बूथवर आॅनलाईन मतदार यादी तपासण्याचे काम सुरू होते. मात्र, याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. काही काळ तणावाचे वातावरण होते. याच मतदारसंघातील सांडगेवाडीत मतदानयंत्र बंद पडले होते; मात्र ते तत्काळ बदलण्यात आले.
कवठेमहांकाळ शहरात विद्यानगर येथील महांकाली हायस्कूलवरील बूथ क्रमांक १६ व १७ वर मतदान सुरू असताना, रस्त्यावरच आर. आर. पाटील व अजितराव घोरपडे समर्थकांत वादावादीची घटना घडली. यावेळी पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद कवठेमहांकाळ पोलिसांत घोरपडे समर्थक राजू घाडगे यांनी दिली. या घटनांवरून मतदारसंघातील चुरस स्पष्टपणे दिसून आली. सांगलीच्या टिंबर एरियामधील संजयनगर झोपडपट्टीवासीयांनी
सकाळपासून मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. सुविधा व घरबांधणीकडे झालेल्या दुर्लक्षाचे कारण त्यांनी सांगितले होते. राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर एकाचवेळी झोपडपट्टीतील ५०० मतदार रांगेत आल्याने सांगलीच्या कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात लांबच्या लांब रांग लागली. तेथे रात्री साडेसातपर्यंत मतदान सुरू होते.
फटाक्यांची आतषबाजी सांगलीतील काही उत्साही शिवसैनिकांनी मारुती चौकात फटाके उडविले, तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खणभागात फटाके उडवून आनंद व्यक्त केला. नेत्यांनी त्यांची खरडपट्टी काढल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषाचा बेत रद्द केला.
अशा आहेत मुख्य लढती...
सांगली : मदन पाटील (काँग्रेस), पृथ्वीराज पवार (शिवसेना), सुधीर गाडगीळ (भाजप), सुरेश पाटील (राष्ट्रवादी).
मिरज : सुरेश खाडे (भाजप), सिद्धार्थ जाधव (काँग्रेस), तानाजी सातपुते (शिवसेना), सी. आर. सांगलीकर (अपक्ष).
तासगाव-कवठेमहांकाळ : आर. आर. पाटील (राष्ट्रवादी), अजितराव घोरपडे (भाजप).
पलूस-कडेगाव : पतंगराव कदम (काँग्रेस), पृथ्वीराज देशमुख (भाजप).
जत : विलासराव जगताप (भाजप), विक्रम सावंत (काँग्रेस), प्रकाश शेंडगे (राष्ट्रवादी).
खानापूर : अनिल बाबर (शिवसेना), सदाशिवराव पाटील (काँग्रेस), गोपीचंद पडळकर (भाजप), अमरसिंह देशमुख (राष्ट्रवादी).
शिराळा : शिवाजीराव नाईक (भाजप), सत्यजित देशमुख (काँग्रेस), मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी).
इस्लामपूर : जयंत पाटील (राष्ट्रवादी), जितेंद्र पाटील (काँग्रेस), अभिजित पाटील (अपक्ष).
मतदारसंघ२००९ मध्ये२०१४ मध्ये
सांगली५८.७६५९.११
शिराळा७७.४७७८.८७
तासगाव-क. महांकाळ६३.४४ ७६.६१
पलूस-कडेगाव७८.००८१.६४
मिरज६२.७३६१.३०
खानापूर६७.५१७३.०४
इस्लामपूर७५.५९७२.०३
जत६६.००६७.९६
एकूण६८.६८७०.८४
अंजनीत गोंधळ
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अंजनी या गावी मतदान केंद्र क्र. १४८ वर दुपारी तीनच्या सुमारास एका अल्पवयीन मुलीने दुसऱ्या तरुणीच्या नावे मतदान करण्याचा प्रयत्न केला. ते केंद्र अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच तिने पळ काढला. मतदान प्रतिनिधीने याप्रकरणी आक्षेप नोंदविला.
हरिपुरात तरुणास मारहाण
शिवसेनेला मतदान का करीत
नाहीस, अशी दमदाटी करून मारहाण केल्याची फिर्याद विकास हणमंत पवार (रा. हरिपूर, ता. मिरज) याने शहर पोलिसांत दिली.
आता लक्ष निकालाकडे
मतदानयंत्रांत भवितव्य बंद झाल्यानंतर जिल्ह्याचे लक्ष आता १९ आॅक्टोबरच्या निकालाकडे लागले आहे. उमेदवारांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढत आहेत.