शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

सांगलीत अळ्यामिश्रीत, गढुळ पाणीपुरवठा, संताप सोशल मिडियाद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 16:41 IST

सांगली शहरातील रामनगर, गावभाग, पाटणे प्लॉट, गवळी गल्ली, खणभाग व शहराच्या पश्चिम परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अळ्यामिश्रीत व गढुळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबतचा संताप सोशल मिडियाद्वारे परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देनागरिकांचा सोशल मिडियाद्वारे संताप रामनगर, गावभाग, पाटणे प्लॉट, गवळी गल्ली, खणभाग परिसरातील चित्र

सांगली : शहरातील रामनगर, गावभाग, पाटणे प्लॉट, गवळी गल्ली, खणभाग व शहराच्या पश्चिम परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अळ्यामिश्रीत व गढुळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबतचा संताप सोशल मिडियाद्वारे परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.शनिवारी सांगलीतील दूषित पाणीपुरवठ्याबद्दलचे संदेश सोशल मिडियावरून व्हायरल झाले. संबंधित भागातील अशा पाण्याची छायाचित्रेही फिरत होती. गढुळ व अळ्यामिश्रीत पाणीपुरवठ्याचा प्रकार वारंवार तिन्ही शहरांमध्ये आढळून येतो. अनेकदा याविषयी संबंधित भागातील नागरिकांना आंदोलनेही केली आहेत. महापालिका नगरसेवकांनीही भर सभेत अशा गढुळ पाण्याच्या बाटल्या आणून संताप व्यक्त केला होता.

गेल्या सहा दिवसांपासून शहराच्या पश्चिम भागात आळ्या व मातीमिश्रीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहे. महापालिकेच्या यंत्रणेमार्फत वारंवार पाणीशुद्धिकरणाचे दाखले दिले जातात, प्रत्यक्षात होणारा पाणीपुरवठा हा शुद्ध नसल्याचे दिसून आले.

महापालिका क्षेत्रातील पिण्याच्या पाईपलाईन व ड्रेनेजच्या पाईपलाईन एकाच मार्गावरून जाताना दिसतात. त्यामुळे बऱ्यांचदा जलवाहिन्यांना गळती लागून त्याद्वारे सांडपाणी मिसळल्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. गॅस्ट्रोच्या साथीने अनेकांचा बळीही गेला होता. त्यामुळे नागरिकांना नेहमीच महापालिकेच्या पाण्याच्या शुद्धतेबद्दल शंका वाटत असते.पाणीपुरवठ्या यंत्रणा सुधारण्यासाठी अनेक आंदोलने झाली, मात्र सुधारणा फारशी झालेली नाही. महापालिकेची याबाबतची उदासिनता नेहमीच स्पष्ट झाली आहे. महापालिका क्षेत्रात सध्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण यात अधिक आहे. त्यामुळे नागरिकांमार्फत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाबद्दल संतप्त प्रतीक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीpollutionप्रदूषण