सांगलीत १७ तळीरामांना अटक

By Admin | Updated: December 23, 2014 00:34 IST2014-12-23T00:34:49+5:302014-12-23T00:34:49+5:30

वाहने जप्त : नशेत वाहन चालविणे भोवले

Sangaliat 17 Tali Ram arrested | सांगलीत १७ तळीरामांना अटक

सांगलीत १७ तळीरामांना अटक

सांगली : दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांविरुद्ध पोलिसांनी पुन्हा एकदा मोहीम सुरु केली आहे. गेल्या तीन दिवसात सांगली, मिरजेत १७ तळीरामांना अटक करण्यात आली आहे. त्यांची वाहने जप्त केली आहेत. ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सांगितले.
अटक केलेल्यांमध्ये विनोद दत्तात्रय वाघमारे (वय ३१) संजय नागनाथ आपाते (२८, दोघे रा. वारणाली, विश्रामबाग), रामचंद्र आबा गडदे (५१, कुपवाड), यशवंत विष्णू कदम (३०, शामरावनगर, सांगली), सुखदेव वसगाप्पा कांबळे (३५, हनुमाननगर, सांगली), सोमेश सुशील लोखंडे (१९, वानलेसवाडी), महादेव रामचंद्र वाघमोडे (४३, मिरज), लकाप्पा सोमराव हिंगनवार (४०, नांगराळे, ता. चिक्कोडी), सुशीलकुमार धोंडीराम फडतरे (४०, घालवाड, ता. शिरोळ), अब्दुल ईलाई मुल्ला (४३, खिद्रापूर, ता. शिरोळ), संजय बाळासाहेब कदम (४४, विजयनगर, सांगली), नंदकुमार श्रीकांत देवरादर (३४, भारतनगर, मिरज), काडाप्पा रामाप्पा गस्ते (३८, माळी चित्रमंदिरजवळ, सांगली), हर्षद हंबीरराव पाटील (२३, पेठ, ता. वाळवा), कुमार वसंत बनसोडे (३३, इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली), कृष्णा गुराप्पा चौगुले (३२, डी मार्टमागे, शंभरफुटी रस्ता, सांगली) व रविराज पांडुरंग कुदळे (३१, पाकीजा मशिदीसमोर, शंभरफुटी, सांगली) यांचा समावेश आहे.
दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांना पकडण्यासाठी सांगली व मिरज वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे १९ डिसेंबरपासून मोहीम उघडण्यात आली आहे. २१ डिसेंबरपर्यंत १७ तळीराम सापडले आहेत. ही कारवाई दररोज सुरु ठेवली जाणार असल्याचे पोलीसप्रमुख सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Sangaliat 17 Tali Ram arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.