शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

सांगलीवाडीतील बेपत्ता व्यक्तीचा विजापुरात खून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 2:45 PM

गेल्या तेरा दिवसापासून बेपत्ता असलेल्या सांगलीवाडीतील सुरेश संगाप्पा सुतार (वय ४८) यांचा कर्नाटकातील विजापूर येथे खून झाल्याचे रविवारी सकाळी निष्पन्न झाले. पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून अंधश्रद्धेतून त्यांचा खून झाल्याचा संशय आहे.

 सांगली -  गेल्या तेरा दिवसापासून बेपत्ता असलेल्या सांगलीवाडीतील सुरेश संगाप्पा सुतार (वय ४८) यांचा कर्नाटकातील विजापूर येथे खून झाल्याचे रविवारी सकाळी निष्पन्न झाले. पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून अंधश्रद्धेतून त्यांचा खून झाल्याचा संशय आहे. सांगली शहर पोलिसांचे पथक तातडीने विजापूरला रवाना झाले आहे.

सुरेश सुतार हे सुतार काम करीत होते. १३ मार्चला दुपारी तीन वाजता त्यांना मोबाईलवर एक कॉल आला. त्या व्यक्तीशी सुतार काही वेळ बोलले. ‘काम होत असेल तर मी लगेच येतो’, असे त्यास म्हणाले. त्यानंतर घरात कोणाला काही न सांगता साडेतीन वाजता निघून गेले. पण ते परत आले नाहीत. नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र मोबाईल बंद होता. त्यांचा सर्वत्र शोधही घेतला. परंतु कुठेच सुगावा लागला नाही. त्यामुळे ते बेपत्ता असल्याची फिर्याद १५ मार्चला शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिस तपास संथगतीने सुरु राहिल्याने नातेवाईकांनी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांची भेट घेवून तक्रार दाखल केली. बोराटे यांनी शहर पोलिसांकडून तपासाचा आढावा घेवून तातडीने याचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. नातेवाईकांनी चाँद नामक व्यक्तीवर संशय घेतला. पोलिसांनी चाँदला ताब्यात घेऊन चौकशी केली. पण काहीच धागेदोरे न मिळाल्याने त्याला सोडून दिले होते. सुतार यांचा विजापुरात खून झाल्याची मािहती रविवारी सकाळी शहर पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांचे पथक तातडीने विजापूरला रवाना झाले आहे. संशयित चाँद खुनाचा सुत्रधार असण्याची शक्यता आहे. त्याने सुतार यांना पैशाचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखविले. या बदल्यात त्याने सुतार यांच्याकडून काही रक्कम घेतली होती. मात्र चाँदने पैशाचा पाऊस पाडलाच नाही. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सुतार यांनी पैशाची मागणी केली. यातून त्यांच्यात वादही झाले होते. खुनामागे हे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. दुस-या दिवशीच खूनसुतार १३ मार्चला बेपत्ता झाल्यानंतर १४ मार्चला विजापूर रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे विजापूर पोलिसांनी पंचनामा व विच्छेदन तपासणी करुन हा मृतदेह शवागृहात ठेवला आहे. १३ मार्चलाच सुतार यांचा खून झाल्याची शक्यता आहे. त्यांचे डोके दगडाने ठेचले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा