तासगावात अडीच कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:25 IST2021-03-06T04:25:46+5:302021-03-06T04:25:46+5:30

लोगो : तासगाव नगरपालिका तासगाव : तासगाव नगरपालिकेकडून अडीच कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामांची वर्कऑर्डर झाली ...

Sanction for works worth Rs 2.5 crore in Tasgaon | तासगावात अडीच कोटींच्या कामांना मंजुरी

तासगावात अडीच कोटींच्या कामांना मंजुरी

लोगो : तासगाव नगरपालिका

तासगाव : तासगाव नगरपालिकेकडून अडीच कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या कामांची वर्कऑर्डर झाली असून लवकरच कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे पक्षप्रतोद जाफर मुजावर आणि उपनगराध्यक्ष दत्तात्रय रेंदाळकर यांनी दिली. शहरातील प्रलंबित कामांना खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून गती देण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

शहरातील विकासाचा समतोल साधत सर्वांगीण विकासासाठी खासदार संयजकाका पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असल्याचे मुजावर यांनी सांगितले.

शहरात दलित वस्ती योजनेतून मोरे घर ते निंबाळकर वस्तीपर्यंत रस्ता करण्यासाठी तीस लाख, स्टेशन रोड ते साठेनगरपर्यंत रस्ता करण्यासाठी २६ लाख २७ हजार, भिलवडी स्टेशन रोड ते कॅनॉलपर्यंत रस्ता करण्यासाठी २० लाख, कांबळेवाडी येथे शाळा बांधण्यासाठी ५५ लाख ३३ हजार रुपये, वरची गल्ली येथे व्यायामशाळेसाठी ४४ लाख ५४ हजार रुपये आणि नगर परिषदेच्या शाळा नंबर ७ येथील कुंपण भिंतीसाठी ६ लाख ५२ हजार रुपयांच्या कामांची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. विटा नाका येथे नगरोत्थान योजनेतून पाण्याच्या टाकीच्या ७० लाखांच्या कामाची निविदा प्रक्रिया झाली असून लवकरच या कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मुजावर यांनी दिली.

Web Title: Sanction for works worth Rs 2.5 crore in Tasgaon