हुतात्मा दूध संघातर्फे संभाजी गुरव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:21 IST2021-06-02T04:21:04+5:302021-06-02T04:21:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले पोलीस उपनिरीक्षक व पडवळवाडी गावचे पुत्र संभाजी गुरव यांचा ...

Sambhaji Gurav felicitated by Hutatma Dudh Sangh | हुतात्मा दूध संघातर्फे संभाजी गुरव यांचा सत्कार

हुतात्मा दूध संघातर्फे संभाजी गुरव यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले पोलीस उपनिरीक्षक व पडवळवाडी गावचे पुत्र संभाजी गुरव यांचा सत्कार हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनी केला.

नायकवडी म्हणाले, संभाजी गुरव यांचे माध्यमिक शिक्षण हुतात्मा विद्यालयातून झाले आहे. त्यांचे वडील नारायण गुरव हुतात्मा दूध संघाचे जेष्ठ संस्थापक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या आई सध्या हयात नाहीत तरीही ते दु:ख सावरून त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे.

यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, अभियंता व्ही. डी. वाजे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नंदू पाटील, महादेव माने, वाळव्याच्या सरपंच डाॅ. शुभांगी माळी व दूध संघाचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Sambhaji Gurav felicitated by Hutatma Dudh Sangh