इस्लामपुरात विनापरवाना भाज्यांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:26 IST2021-05-09T04:26:33+5:302021-05-09T04:26:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीने इस्लामपूर आष्टा येथील बाजार आवारात दि. ५ ते १३ मेपर्यंत ...

इस्लामपुरात विनापरवाना भाज्यांची विक्री
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीने इस्लामपूर आष्टा येथील बाजार आवारात दि. ५ ते १३ मेपर्यंत भाजी व फळांचे लिलाव बंद केले आहेत. तरीही भल्या पहाटे बाजार समितीच्या आवारात विनापरवाना भाजीपाला विक्री सुरू आहे. शहरांतील ग्राहक या ठिकाणी गर्दी करीत आहेत.
इस्लामपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. बेड मिळत नाहीत, म्हणून रुग्ण दगावत आहेत, तरीही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. औषध दवाखाने वगळता सर्व व्यवहार बंद आहेत, तरीही काही व्यापारी चोरून विक्री करीत आहेत. त्यामुळे कडक लॉकडाऊन असतानाही नागरिक रस्त्यावर दिसत आहेत.
जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांंना १३ मेपर्यंत भाजीपाला, फळे, धान्य यांचे लिलाव बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. इस्लामपूर पालिकेने शहराच्या सीमा सील केल्या आहेत, तरीही सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत ठोक भाजी विक्रते बाजार समित्यांच्या आवारात विनापरवाना भाजी विकत आहेत. त्यामुळे ग्राहक भाजी घेण्यासाठी गर्दी करत आहे. एकीकडे किरकोळ भाजी विकू दिली जात नाही. दुसरीकडे सकाळी लवकर येऊन ठोक व्यापारी यार्डात गर्दी करू लागला आहे.
कोट
जिल्हा अधिकारी सांगली यांनी ५ ते १३ मेपर्यंत भाजीपाला लिलाव बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे आम्ही व्यापाऱ्यांना कळविले आहे. त्याची नोटीसही यार्डात लावली आहे. सकाळी भाज्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करू.
- विजय जाधव
सचिव
कृषी उत्पन्न बाजार समिती इस्लामपूर
फोटो : ०८ इस्लामपुर १
ओळी : सकाळी सात ते आठच्या दरम्यान बाजार समितीमध्ये भाजी विक्रते गर्दी करतात.