४0 टन रेशीम कोशांची कर्नाटकात विक्री
By Admin | Updated: January 26, 2015 00:36 IST2015-01-26T00:34:50+5:302015-01-26T00:36:55+5:30
जिल्ह्यातील रेशीम उद्योग : जतमध्ये सर्वाधिक तुतीची लागवड; शेतकऱ्यांकडून प्रयोग सुरू

४0 टन रेशीम कोशांची कर्नाटकात विक्री
नरेंद्र रानडे / सांगली
जिल्ह्यातील शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करीत असून, एकच पीक घेण्याकडे असलेला कल बदलत चालला आहे. इतर कोणत्याही पिकापेक्षा अधिक फायदेशीर असलेल्या आणि नुकसानकारक नसलेल्या तुतीची लागवड करण्याला शेतकरी पसंती देत आहेत. यंदा जिल्ह्यातील २३९ शेतकऱ्यांनी २७१ एकर जागेत तुतीची लागवड करून ४०.७ टन रेशीम कोशांचे उत्पादन केले आहे. या सर्व कोशांची कर्नाटकच्या बाजारपेठेत विक्री करण्यात आली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी १.१३ कोटी रुपये पडले आहेत.