फलटण-मिरज रस्त्यासाठी नितीन गडकरींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST2021-01-04T04:22:29+5:302021-01-04T04:22:29+5:30

फोटो ०३ नितीन गडकरी मंत्री नितीन गडकरी यांना प्राजक्ता कोरे यांनी रस्ते कामासाठी नागपुरात निवेदन दिले. लोकमत न्यूज नेटवर्क ...

Sakin to Nitin Gadkari for Phaltan-Miraj road | फलटण-मिरज रस्त्यासाठी नितीन गडकरींना साकडे

फलटण-मिरज रस्त्यासाठी नितीन गडकरींना साकडे

फोटो ०३ नितीन गडकरी

मंत्री नितीन गडकरी यांना प्राजक्ता कोरे यांनी रस्ते कामासाठी नागपुरात निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : फलटण ते म्हैसाळ राज्यमार्गाचे काम गतीने सुरू करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी नागपुरात गडकरी यांना निवेदन देऊन काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली.

फलटण ते म्हैसाळमधील किलोमीटर क्रमांक १२६-०० ते २११ हा टप्पा केंद्रीय रस्ते प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. त्यातून रस्त्याचे चारपदरी काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद व अंदाजपत्रकही पूर्ण झाले आहे. निविदा व अन्य प्रशासकीय प्रक्रिया मात्र रखडली आहे. प्राजक्ता कोरे यांनी याकडे गडकरींचे लक्ष वेधले. या रस्त्यामुळे सांगली, फलटण, बारामती हा प्रवास गतीने होऊ शकतो, त्यामुळे काम त्वरित सुुरू होण्याची गरज असल्याचे सांगितले. गडकरी यांनी यासंदर्भात संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन दिले.

चौकट

असा आहे रस्ता...

फलटण ते म्हैसाळपैकी म्हैसाळकडून ८५ किलोमीटरचा रस्ता चौपदरी केला जाणार आहे. तो संपूर्ण सिमेंटचा असेल. राज्याच्या ताब्यातून तो केंद्राकडे वर्ग झाला आहे. मिरज-सांगलीतून तासगाव-विटा-मायणी असा जातो. प्रस्तावित अंतरापैकी बहुतांशी सांगली जिल्ह्यातच आहे. म्हैसाळमध्ये कर्नाटक हद्दीपर्यंत जाऊन तो थांबतो. सध्या हा दुहेरी रस्ता प्रचंड वाहतुकीचा आहे. तासगावपासून पुढे अत्यंत खराब आहे.

------------

Web Title: Sakin to Nitin Gadkari for Phaltan-Miraj road