सांगलीतील संमेलनात ‘सखीं’ची धम्माल
By Admin | Updated: January 2, 2015 00:08 IST2015-01-01T22:49:24+5:302015-01-02T00:08:29+5:30
मावळत्या २०१४ ला संमेलनाच्या माध्यमातून सखींनी निरोप दिला.

सांगलीतील संमेलनात ‘सखीं’ची धम्माल
सांगली : ‘लोकमत’ सखी मंचतर्फे आयोजित ‘सखी संमेलना’स महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील भावे नाट्य विद्या मंदिरात आयोजित केलेल्या संमेलनात सहभागी सखींनी फॅशन शो, फनिगेम्स आणि नृत्य या माध्यमातून कलाविष्कार सादर केला आणि अक्षरश: धम्माल केली. मावळत्या २०१४ ला संमेलनाच्या माध्यमातून सखींनी निरोप दिला.
‘लोकमत’ सखी मंचतर्फे वर्षभरात विविध मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यास महिलांचा नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत होता. मंगळवारी सांगलीत झालेल्या सखी संमेलनास चांगला प्रतिसाद लाभला. दुपारी २ वाजल्यापासूनच सखींची पावले नाट्यगृहाकडे वळत होती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच नाट्यगृह हाऊसफुल्ल झाले होते. गणेशवंदनेने संमेलनास प्रारंभ झाला. यानंतर ड्युएट, सोलो आणि ग्रुप या प्रकारातील नृत्यप्रकार सखींनी सादर केले. फॅशन शो आणि फनिगेम्स यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येक कलाविष्काराला नाट्यगृहात बसलेल्या सखींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. सायंकाळी संमेलनाचा समारोप झाला.
संमेलनात आयोजित विविध कार्यक्रमांत तृप्ती फराटे, वैशाली खटके, उल्का पाटील, शुभांगी पाटील, वैशाली कोरे, रेखा सरनोबत, नीशा करवाडे, तेजस्विनी मोहिते, मधुरा महामुनी, जया जोशी, मंजुषा जोशी, योगिनी करगणीकर, वंदना पाटील, सायली कुलकर्णी, गौरी फडके, सुजाता पाटील, मृण्मयी जोगळेकर, जोत्स्ना मुळगुंद, विद्या शिंदे, राणी सरस्वती कन्या शाळेच्या सोनाली तेली, रुचिता घाटगे, कोमल परदेशी, सायली परदेशी, प्रज्ञा डवरी, सलोनी जमदाडे, पूनम करांडे, नेहा पाटील, पल्लवी पाटील, गीतांजली देसाई, विमल शेट्टी, वर्षा चौगुले, जयश्री माने, लता कुचीकर, भारती माणकापुरे, पूजा कुलकर्णी, साधना माळी, स्मिता पाटील आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)