शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: 'साधना'चे डॉक्टर होण्याचे 'स्वप्न निर्दयी वडिलामुळे राहिले अपूर्ण; पालकांच्या अपेक्षांचे विद्यार्थ्यांवर ओझे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 19:38 IST

लक्ष्मण सरगर आटपाडी : शिक्षक व पालक यांच्या एकत्रित जबाबदारीतील सामूहिक अपयशाचे परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतात. हे खूपच हृदयद्रावक ...

लक्ष्मण सरगरआटपाडी : शिक्षक व पालक यांच्या एकत्रित जबाबदारीतील सामूहिक अपयशाचे परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतात. हे खूपच हृदयद्रावक आहे. नेलकरंजी (ता. आटपाडी) येथील साधना धोंडिराम भोसले ही शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणारी, डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिलेली मुलगी, जी शिक्षणात हुशार असताना, शिक्षणाच्या योग्यतेसाठीच्या दबावाखाली आपले जीवन गमावते. तिच्या मृत्यूने शिक्षण, समाज आणि पालकत्व यावर कठोर विचार करणे अनिवार्य बनवले आहे.ही घटना केवळ मृत्यू नाही, तर हा अपेक्षेने केलेला खून आहे. साधनाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. ही एक खळबळ उडवणारी, मनाला वेदना देणारी सामाजिक गोष्ट आहे. जी शिक्षण क्षेत्राच्या आपल्या साच्यात खूप खोलवर छेद करायला लावते.साधना भोसलेने कसून सराव परीक्षेचा अभ्यास केला. शालेय जीवनात शिक्षण आणि भविष्याशी संबंधित अशी एक सराव परीक्षा. त्यात तिला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. इथे मुलीला समजावून सांगणे, तिच्या भावनांना महत्त्व देणे, तिला धीर देणे, हे खरे पालकत्व होते; पण पालकांच्या मनातली एकच विचारधारा होती, कमी गुण कसे मिळाले? तिला मोठे व्हायचे आहे? या चुकलेल्या मानसिकतेला आणि दबावाखाली साधनाची झालेली हत्या अधिक वाईट बनवते.तिचे वडील, एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना खचून न जाता प्रयत्न करण्याचे धडे शिकवतात; पण त्याच शिक्षक पित्याने मुलीला जीवनाचा सर्वोत्तम धडा दिला असावा. शिक्षणातील चुका माफ करायला हव्यात. त्यांनी शिक्षकाची भूमिका ठेवली असती; परंतु शिक्षेच्या अनियंत्रित आक्रमकतेने त्यांनी आपल्या मुलीचा जीव घेतला.

स्पर्धेचा वेग अन् मनावरचे दडपणसमाज आणि शिक्षण संस्था मुलांचे भविष्य आणि शिक्षण हे गुणांसह परिभाषित करतात. शिकवणीमध्ये, शाळेत परीक्षा, गुणांचे महत्त्व समजावले जाते. पालकांचा एकच दबाव असतो तो म्हणजे सर्वश्रेष्ठ यश मिळवणे. याच कारणातून साधनावर केलेली शारीरिक आणि मानसिक मारहाण माणुसकीला धक्का देणारी आहे.

तिला डॉक्टर व्हायचे होतेसाधनाला दहावीत ९५ टक्के गुण मिळाले होते. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते. त्यासाठी ती तयारी करत होती; परंतु एका चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे शिक्षक पित्याने तिला मारहाण केली. मारहाणीत तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नेलकरंजीतील साधनाचा मारहाणीतील मृत्यू म्हणजे तिच्या शिक्षक वडिलांनी विवेक गमावल्याचे दिसून येते. जर ती दहावीला ९५ टक्के गुण मिळवू शकते, तर तिचा बुध्यांक चांगला आहे, हे लक्षात यायला हवे होते. शिक्षक असूनही त्यांनी विवेक गमावून मारहाण केल्यामुळे ही घटना घडली. मुलांना किती टेन्शन देऊन स्पर्धेत ढकलून द्यायचे याचा विचार करण्याची गरज आहे. मुलांच्या बाबतीत रागावर नियंत्रण ठेवणे, तर्कशुद्ध विचार याची प्रत्येकाने अंमलबजावणी करावी. -डॉ. प्रदीप पाटील, समुपदेशक, सांगली.