पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सदाभाऊ खोत उतरले पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 06:05 PM2019-08-05T18:05:12+5:302019-08-05T19:35:47+5:30

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज वाळवा तालुक्यातील शिरगाव गावाला पाण्याने वेढल्याचे समजताच स्वतः कंबरेभर पाण्यामध्ये जाऊन होडीने प्रवास करीत शिरगाव  व वाळवा गावास भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला

Sadbhau Khot visits flood affected villages | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सदाभाऊ खोत उतरले पाण्यात

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सदाभाऊ खोत उतरले पाण्यात

Next

सांगली - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज वाळवा तालुक्यातील शिरगाव गावाला पाण्याने वेढल्याचे समजताच स्वतः कंबरेभर पाण्यामध्ये जाऊन होडीने प्रवास करीत शिरगाव  व वाळवा गावास भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. तसेच गावातील लहान लेकरांना भाऊंनी स्वतःच्या खांद्यावरती घेऊन बाहेर काढले.

 तसेच यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यानुसार NDRF च्या पुणे व कोल्हापूर वरून 2 टिम व कोल्हापूर येथील  टेकर्स टीम घटनास्थळी दाखल  होत आहेत. ह्या टीम काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षितस्थळी दाखल करणार आहेत. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नागेश पाटील व तहसीलदार सुनील शेरखाने व तालुका कृषी अधिकारी भगवान माने हे उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत आहे.

यावेळी गौरव नायकवडी, सुषमाताई नायकवडी, उपसरपंच पोपट अहिर,दि.बा.पाटील, नंदकुमार पाटील,शशिकांत शेळके, संतोष पाटील,मानाजी सापकर व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Sadbhau Khot visits flood affected villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली