शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात विरोधकांच्या गाडीला सदाभाऊंचे इंधन

By admin | Updated: July 7, 2016 00:27 IST

नगरपालिका निवडणूक : सुसाट धावणाऱ्या जयंत एक्स्प्रेसला रोखण्याचा जोरदार प्रयत्न

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर इस्लामपूर नगरपालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीची ‘जयंत एक्स्प्रेस’ सुसाट धावत आहे. आर्थिक इंधन नसलेल्या विरोधकांच्या गाडीत मात्र अंतर्गत मतभेद आणि अहंपणा असल्याने त्यांच्या गाडीचा वेग मंदावला आहे. विरोधकांच्या पाठीशी राज्यातील सत्ताकेंदे्र आहेत. त्यातच शहरात वास्तव्य करणारे आमदार सदाभाऊ खोत यांना मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. ते मंत्री झाल्यास विरोधकांच्या मंदावलेल्या गाडीचा वेग वाढणार आहे. यातूनच जयंत एक्स्प्रेसला रोखण्याचा प्रयत्न होणार आहे. इस्लामपूर शहराचा विकास हा ज्वलंत प्रश्न आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या तारांकित कल्पनेतून पुढे आलेल्या विकास कामांचे तीनतेरा वाजले आहेत. पालिकेच्या सभागृहात विरोधकांची तीन डोकी आहेत. परंतु त्यांनी वेगवेगळ्या टोप्या घातल्या आहेत. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी शहराचा नियोजित विकास आराखडा स्वत:च्या मालमत्ता वाचवून आणि बेकायदेशीर गोष्टी कायदेशीर करुन स्वबळावर मंजूर केला आहे. विरोधकांची राज्यात सत्ता असतानाही त्यांना इस्लामपुरातील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सभागृहाला धक्का लावता आला नाही. त्यामुळे विरोधकांची ताकद असून नसल्यासारखीच आहे. विस्कटलेल्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी खासदार राजू शेट्टी आणि मंत्रीपदाच्या उंबरठ्यावर असलेले आमदार सदाभाऊ खोत सरसावले आहेत. या दोघांना शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांची साथ राहणार आहे. त्यांनाही कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळणार असल्याचे वृत्त आहे. त्यावरही बरीच समीकरणे अवलंबून आहेत. मागील निवडणुकीत विरोधकांच्या बाजूने खासदार राजू शेट्टी, शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत यांच्यासह सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांची ताकद होती. परंतु राज्यात सत्ता नसल्याने ही ताकद अत्यंत तोकडी पडली. आता राज्यात भाजपची सत्ता आहे. सत्ताधाऱ्यांचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याकडे मंत्रीपद नाही. तरीही विविध संस्थांवर असलेल्या प्राबल्यामुळे ‘जयंत एक्स्प्रेस’ या भागात सुसाट आहे. येणाऱ्या काळात आमदार सदाभाऊ खोत, शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळाले तरी, ते जयंत एक्स्प्रेसला रोखण्यात कितपत यशस्वी होतात, हे दिसून येणार आहे. याकडे सर्वांचे लक्षही लागले आहे. मंत्रीपदानंतरच मैदानात उतरण्याची तयारी! येणाऱ्या दोन दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. वाळवा—शिराळ्यातील सदाभाऊ खोत आणि शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मंत्री झाल्यानंतरच ते पालिकेच्या रणांगणात उतरणार असल्याचे विरोधकांतून बोलले जात आहे.