रूपाली सोळसेला आता ‘सुखायू’चाही आधार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:10 IST2020-12-05T05:10:05+5:302020-12-05T05:10:05+5:30

शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथील दिव्यांग रूपाली भगवान सोळसे हिच्यासाठी आता समाजातूनही मदत येत आहे. सांगली येथील सुखायू ...

Rupali Solasela is now also the basis of 'Sukhayu'; | रूपाली सोळसेला आता ‘सुखायू’चाही आधार;

रूपाली सोळसेला आता ‘सुखायू’चाही आधार;

शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथील दिव्यांग रूपाली भगवान सोळसे हिच्यासाठी आता समाजातूनही मदत येत आहे. सांगली येथील सुखायू जन्मजात व्याधी प्रतिबंध व साहाय्य प्रतिष्ठानने तिची औषधोपचार आदींची जबाबदारी स्वीकारली आहे. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दीक्षित व उपाध्यक्षा डॉ. नंदिनी पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

रूपाली सोळसे ही ७६ टक्के दिव्यांग आहे. मात्र दुर्धर आजाराने तिचे आधारकार्ड निघत नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर गुरुवारी प्रशासनाने तिच्या आधारकार्डची प्रक्रिया पूर्ण केली. आता सांगलीतील सामाजिक संस्थेनेही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

डॉ. पाटील म्हणाल्या, आमची संस्था जन्मजात व्याधीग्रस्त व्यक्तींचा सर्वंकष विकास व त्यांना आवश्यक उपचार, साधने, समुपदेशन व इतर सुविधा यासाठी कार्यरत आहे. रूपालीबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त वाचले. त्यानंतर आम्ही या कुटुंबाशी संपर्क केला असून रूपालीची शनिवार दि. ५ रोजी सर्व आरोग्य तपासणी करणार आहे. तिला आवश्यक औषधे, कपडे, व्हीलचेअर, किराणा माल व दिव्यांग दाखलाही मिळवून देणार आहोत. तसेच रूपालीची आरोग्य तपासणी झाल्यावर तिला आवश्यक व्यायाम आदींची माहिती तिच्या पालकांना देणार आहे.

कोट

‘लोकमत’मुळे २७ वर्षे उपेक्षित राहिलेल्या रूपालीला आधारकार्डच्या रूपाने आधार मिळाला आहे. त्याचबरोबर आता तिला योग्य औषधोपचार तसेच मार्गदर्शन मिळणार आहे. एका उपेक्षित मुलीस व कुटुंबास न्याय मिळाला आहे.

- महादेव देसाई, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, पाडळी

Web Title: Rupali Solasela is now also the basis of 'Sukhayu';