शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

कोंबड्यांनाही लम्पी संसर्गाच्या समाजमाध्यमांवर अफवा, पशुसंवर्धन विभागाने केला नेमका खुलासा

By संतोष भिसे | Updated: September 17, 2022 14:20 IST

कोरोनाकाळातही कोंबड्यांना कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याचा मोठा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला होता.

सांगली : पोल्ट्रीमधील कोंबड्यांनाही लम्पीची लागण होत असल्याच्या अफवा पसरु लागल्या आहेत, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक हैराण झाले आहेत. पण गाई-म्हैशींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पशुपक्ष्याला लम्पीची लागण होत नसल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.राज्यात लम्पीचा फैलाव हळूहळू वाढत आहे. सांगली जिल्ह्यातही रोगग्रस्त जनावरांची संख्या वाढत आहे. या स्थितीत अफवांचेही पीक आले आहे. माणसांनाही लम्पीचा संसर्ग होतो, लम्पीग्रस्त जनावराचे दूध पिऊ नये अशी माहिती समाजमाध्यमांवर पसरत आहे. अर्थात, त्याला कोणताही आधार नाही. माणसांना संसर्ग होणे किंवा लम्पीग्रस्त जनावराचे दूध बाधक असणे ही माहिती पशुसंवर्धन विभागाने स्पष्टपणे नाकारली आहे. शिवाय, राज्यात कोठेही माणसाला संसर्ग झाल्याचे उदाहरण नाही. किंबहुना माणसाला त्याची लागण होतच नाही असा खुलासा तज्ज्ञांनी केला आहे.या स्थितीत अफवाखोरांनी पोल्ट्रीतील कोंबड्यांना लक्ष्य केले आहे. कोंबड्यांनाही लम्पीची लागण होत असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यासाठी काही कोंबड्यांची छायाचित्रेही पसरवली जात आहेत. त्यांच्या अंगावर गाठी दिसत आहेत. या अफवेमुळे पोल्ट्री व्यावसायिक हैराण झाले आहेत. कोरोनाच्या दणक्यातून सावरलेल्या पोल्ट्री व्यवसायात स्थिरता येत असताना आता लम्पीच्या अफवेचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाकाळातही कोंबड्यांना कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्याचा मोठा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला होता. ही तर देवी!कोंबड्यांच्या त्वचेवर किंवा मांसावर दिसणाऱ्या गाठी म्हणजे देवी आजार असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. हा जुनाच आजार असून त्यावर लसही उपलब्ध आहे. वाढीच्या अवस्थेतच लस टोचल्यास देवी उदभवत नाही. शिवाय देवी झाल्यावरही  औषध लावल्यास  रोगाचे निर्मूलन होते.

कोंबड्यांना लम्पी आजार होत नाही. किंबहुना गाय आणि म्हैशीव्यतिरिक्त अन्य कोणताही पशुपक्षी किंवा माणसांना लम्पीचा संसर्ग होत नाही. म्हैशीमध्ये लागण होण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे कोंबड्यांविषयी गैरसमज अजिबात बाळगू नये. - डॉ. बी. डी. कदम, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग

टॅग्स :Sangliसांगली