ठळक मुद्देमहापालिकेचे अग्निशमन कार्यालय हलविण्यास सत्ताधारी भाजपचा विरोधनगरसेविका स्वाती शिंदे, भारती दिगडे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदन
सांगली : महापालिका प्रशासनाने अग्निशमन कार्यालयाचे अन्यत्र स्थलांतर करण्याचा घाट घातला आहे. त्याला सत्ताधारी भाजपच्या महिला सदस्यांनी गुरुवारी विरोध केला.
नगरसेविका स्वाती शिंदे, भारती दिगडे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना निवेदनही देण्यात आले.यावेळी महिला व बालकल्याण सभापती गीताजंली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.