रॉकेल डेपो, फटाके विक्रेत्यांकडूनही नियमदहन

By Admin | Updated: August 10, 2015 00:54 IST2015-08-10T00:54:06+5:302015-08-10T00:54:06+5:30

उत्पन्नावर पाणी : अंतिम परवाने न घेताच नियमबाह्य कारभार, अग्निशमन विभागाचेही दुर्लक्ष--खेळ आगीशी खेळ जिवाशी-२

Rules of Rokel Depot, Fireworks Sellers | रॉकेल डेपो, फटाके विक्रेत्यांकडूनही नियमदहन

रॉकेल डेपो, फटाके विक्रेत्यांकडूनही नियमदहन

अविनाश कोळी- सांगली -ज्वलनशील पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी, विक्रेत्यांनी महापालिकेच्या आगप्रतिबंधक व जीवसंरक्षण अधिनियमाच्या चिंधड्या उडविल्या आहेत. महापालिका शहरातील रॉकेल डेपो, फटाके विक्रेते, गॅस पंप, सॉ मिल तसेच हॉटेल व्यावसायिकांनी नियमदहन करून अंतिम परवान्यासाठी, त्याच्या नूतनीकरणासाठी महापालिकेला ठेंगा दाखविला आहे. कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडून महापालिकेलाही या व्यावसायिकांसमोर हतबल झाल्याचे चित्र आहे.सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ज्वलनशील पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या संस्था, विक्रेते यांनी आगप्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजनांचे पालन करणे सर्वात महत्त्वाचे आहे. घरगुती व व्यावसायिक गॅसचे वितरक, रॉकेल डेपो, गॅस पंप, फटाके विक्रेते यांची यादी महापालिकेकडे आहे. यादी असूनही नियमांच्या अंमलबजावणीबाबत महापालिकेकडून कोणतेही ठोस प्रयत्न होत नाहीत. दुसरीकडे लोकांच्या व स्वत:च्या जिवाशीही खेळ करीत अशा व्यावसायिकांनी नियमदहनाचा बाजार मांडला आहे. स्फोटक पदार्थांच्या ठिकाणी या अधिनियमानुसार सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अनेकांनी आगप्रतिबंधक उपाययोजनाच केल्या नाहीत. काहींनी उपाययोजनेसाठीचा प्राथमिक परवाना घेतला आहे. काहींनी अंतिम परवाना घेऊन त्याचे नूतनीकरण केले नाही. म्हणजेच सर्वत्र बेफिकीरी दिसून येत आहे. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का, असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. शहरातील हॉटेल्स, लॉज, परमिट रूम, बिअरबार, बिअरशॉपी, ५ अश्वशक्तीच्यावरील उद्योग, व्यावसायिक, टिंबर मार्ट, सॉ मिल्स्, फर्निचर शोरूम, केमिकल व ज्वलनशील पदार्थ विक्रीची दुकाने व गोदामे यांनीही आगप्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले आहे. मोजक्याच लोकांनी अंतिम परवाने व नूतनीकरण केल्याचे दिसत आहे.


सॉ मिलकडून नकारघंटा
महापालिका क्षेत्रातील २0 सॉ मिल, टिंबर मर्चंट व्यावसायिकांनी २00८ पासून आजअखेर नूतनीकरण करून घेतलेले नाही. आवश्यक ती फीसुद्धा त्यांनी भरलेली नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागानेच ही माहिती दिली आहे. तरीही कारवाईच्या बाबतीत महापालिकेने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.

सॉ मिलकडून नकारघंटा
महापालिका क्षेत्रातील २0 सॉ मिल, टिंबर मर्चंट व्यावसायिकांनी २00८ पासून आजअखेर नूतनीकरण करून घेतलेले नाही. आवश्यक ती फीसुद्धा त्यांनी भरलेली नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागानेच ही माहिती दिली आहे. तरीही कारवाईच्या बाबतीत महापालिकेने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.
महापालिका क्षेत्रात केमिकल व ज्वलनशील पदार्थांच्या विक्रीची दुकाने, त्यांची गोदामे, फर्निचरची दुकाने, दुचाकी व चारचाकीची शोरूम्स्, पाच अश्वशक्तीवरील उद्योग यांची माहितीच उपलब्ध नाही. त्यामुळे अशा संस्थांना, कारखान्यांना नोटिसा देण्याचाही संबंध उरलेला नाही. महापालिकेच्या या निष्काळजीपणाने संकटाला निमंत्रण देण्याचे काम केले आहे.

Web Title: Rules of Rokel Depot, Fireworks Sellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.