शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांसाठी ५००० कोटींची गरज, आराखडा करण्याच्या जलसंपदामंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:29 IST

जयंत पाटील भाजप प्रवेशाची माहिती नाही

सांगली : जिल्ह्यातील अपूर्ण टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ आणि वाकुर्डे सिंचन योजनांसाठी पाच हजार कोटी रुपये निधीची गरज आहे. या योजनांच्या अपूर्ण कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल तातडीने देण्याची सूचना दिली आहे. या अहवालानंतर निधी मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करणार आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.सांगलीतील वारणालीत बुधवारी जलसंपदा विभागाच्या कामाची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर जलसंपदा मंत्री विखे-पाटील बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, कृष्णा खोरे महामंडळाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आदी उपस्थित होते.

मंत्री विखे-पाटील म्हणाले, जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ, ताकारी, आरफळ, वारणा आणि मोरणा योजनांची अनेक कामे प्रलंबित आहेत. या योजनांसाठी जवळपास पाच हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अपूर्ण योजना २०२८ पर्यंत पूर्ण होतील, असा अंदाज असला तरी निधी उपलब्ध करून देऊन त्या २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पुढील वर्षापासून पुराचे ५५ टीएमसी पाणी वळविणारपूरनियंत्रणासाठी वर्ल्ड बँकेने तीन हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. पुराचे पाणी वळवण्याच्या योजनेच्या कामांची निविदा लवकरच काढली जाणार आहे. पुराचे पाणी एका वर्षात नेण्याचा प्रयत्न आहे. पुढील वर्षापासून ५५ टीएमसी पाणी वळविले जाईल, त्यामुळे पुरापासून मुक्तता होईल, असा विश्वास मंत्री विखे-पाटील यांनी व्यक्त केला.

महापालिकेने प्रदूषण थांबवावे, अन्यथा पाणी कपातराज्यात नदी प्रदूषणाचा विषय गंभीर आहे. याबाबत महानगरपालिका, नगरपालिकांना पाणी दिले जाते. प्रदूषण टाळण्यासाठी महानगरपालिकेस एचटीपी पंप बसवावे लागतील. ज्या महापालिका कार्यवाही करणार नाहीत, त्यांची पाणी कपात करावी लागेल, असा इशारा मंत्री विखे-पाटील यांनी दिला.

जयंत पाटील भाजप प्रवेशाची माहिती नाहीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पक्षाच्या अडचणीच्या काळातही नेतृत्व केले आहे. नवनवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे. त्यामुळे राजीनामा देणार असतील. पण त्यांची भाजपमध्ये येण्यासंदर्भात काहीही माहिती नसल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.