शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

मिरजजवळ दुर्मिळ मांडूळ साप जप्त, बाजारातील किंमत 47 लाख रुपये  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2018 2:07 PM

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकाने अटक केली.

सांगली : मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील यांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 47 लाख रुपये किंमत असलेला मांडूळ जातीचा साप हस्तगत करण्यात आला आहे. हुसेन कोंडीबा तांबोळी (वय 64 वर्ष), लतीफ हुसेन जमादार (वय 65) अशी अटक करण्यात आलेल्या दोन जणांची नावं आहेत. 

तांबोळी व जमादार हे दोघे दुर्मिळ जातीचा मांडूळ या सापाची विक्री करत असल्याची पोलिसांना माहित मिळाली होती. पोलिसांनी दोघांकडे बोगस ग्राहक पाठवून 45 लाख रुपयांत मांडूळ सापाचा सौदा ठरवला. मांडूळ साप घेऊन खंडेराजुरी येथे दोघेजण विक्रीसाठी आल्यानंतर पोलीस पथकाने दोन जणांना 3 किलो वजनाच्या मांडूळ सापासहीत ताब्यात घेतले.

सापाच्या तस्करीप्रकरणी तांबोळी व जमादारविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व  मांडूळ साप वनविभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष पुजारी यांनी फिर्याद दिली आहे. सापाची तस्करी करणाऱ्या टोळीचा सूत्रधाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा