आर.आर. गटाच्या नऊजणांना अटक
By Admin | Updated: July 29, 2014 00:03 IST2014-07-28T23:54:43+5:302014-07-29T00:03:48+5:30
मारामारी प्रकरण : नांगोळेत तणावपूर्ण शांतता

आर.आर. गटाच्या नऊजणांना अटक
कवठेमहांकाळ : नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे रविवारी माजी मंत्री अजितराव घोरपडे व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी सोमवारी नऊजणांना अटक केली. अटक केलेले सर्वजण गृहमंत्री गटाचे असून, त्यांना आज कवठेमहांकाळ न्यायालयाने दि. ३0 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दोन दिवसांपूर्वी नांगोळे येथे संत बाळूमामा यात्रेनिमित्त आर. आर. पाटील समर्थक सचिन हुबाले आणि घोरपडे समर्थक रावसाहेब शिंगाडे यांच्यात किरकोळ वादावादी झाली होती. यातून रविवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान सचिन हुबाले, अरविंद हुबाले,