शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आरिफ शेख- : करोनाच्या रुग्ण सेवेच्या मदतीसाठी 'रोबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 14:31 IST

रोबोट मध्ये कॅमेरा व रेकॉर्डर आहे. आयसोलेशन कक्षा बाहेर थांबून डॉक्टर आतील कोरोना रुग्णासोबत रोबोटद्धारे संवाद साधू शकतात. कॅमेर्‍यातून परिस्थिती पाहू शकतात. मोबाईल अ‍ॅपद्धारे या रोबोटला निर्देश देता येतात. रुग्णसेवकांच्या मदतीसाठी हा 'रोबोट' महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे अरिफ शेख यांनी सांगितले .शेख यांनी यापूर्वीही विविध उपकरणे तयार केली आहेत.

ठळक मुद्देसांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधकाची निर्मिती

सदानंद औंधेमिरज :- कोरोना रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय कर्मचार्‍यांना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या मदतीसाठी 'रोबोट' तयार करण्यात आला आहे. सांगलीतील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील अरिफ शेख या संशोधकाने तयार केलेल्या रोबोट मध्ये ऑटोमॅटिक ऑडिओ व व्हिडीओ कॉन्फरन्सची सोय आहे. शेख यांनी छोटया व मोठ्या आकारातील दोन रोबोट अत्यंत कमी खर्चात तयार केले आहेत.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने सर्वाना खबरदारी घ्यावी लागत आहे. शारिरिक अंतर ,मास्क ,सॅनिटायझरचा वापर व लॉकडाऊन या सर्वसामान्यांसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर व परिचारकांना संसर्गाचा मोठा धोका आहे. आयसोलेशन वॉर्ड मध्ये पीपीई किट , हॅन्डग्लोज, एन 95 मास्क, गॉगल्स घालून त्या कक्षात काम करावे लागते.

रुग्णांवर उपचार किंवा रुग्णांना ओषधे देणे, जेवण देणे, त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करुन रुग्णांच्या जवळ जावे लागते. उपचारावेळी डॉक्टर व रुग्णांना कमीत कमी संपर्क यावा यासाठी रुग्ण सेवा करणारा 'रोबोट' वालचंद महाविद्यालयातील संशोधक आरिफ शेख यांनी तयार केला आहे. आरिफ शेख हे वालचंद महाविद्यालयात प्रॉडक्ट डेव्हलपमेंट या विभागांत सहाय्यक संशोधक म्हणून काम करतात.

रुग्णसेवेसाठी एक छोटा व एक मोठा असे दोन रोबोट तयार करण्यात आले आहेत. मोठा रोबोट 15 ते 25 किलो वजना पर्यंतच्या वस्तू वाहून नेऊ शकतो. लहान रोबोट 5 ते 10 किलो वजनाच्या वस्तू नेऊ शकतो. यात डिजिटल कॅमेरा व डिजिटल ऑडिओ रेकॉर्डिंग , ऑटोमॅटिक ऑडिओ व व्हिडीओ कॉन्फरन्सची सोय आहे. रोबोट मध्ये कॅमेरा व रेकॉर्डर आहे. आयसोलेशन कक्षा बाहेर थांबून डॉक्टर आतील कोरोना रुग्णासोबत रोबोटद्धारे संवाद साधू शकतात. कॅमेर्‍यातून रुग्णाची परिस्थिती पाहू शकतात. मोबाईल अ‍ॅपद्धारे या रोबोटला निर्देश देता येतात.

विलगीकरण कक्षात ठेवलेल्या संशयित रुग्णांच्या सेवेसाठीसुद्धा या रोबोटचा वापर होऊ शकतो.देशात व राज्यात अन्यत्रही रुग्णसेवा करणारे रोबोट तयार करण्यांत आले आहेत .मात्र त्यांचा खर्च लाखांपर्यंत आहे .शेख यांनी तयार केलेल्या इको फ्रेंडली रोबोटच्या निर्मितीसाठी केवळ ३० हजार रुपये खर्च आला आहे.शासकिय आरोग्य विभागाकडून या रोबोटला मागणी असून या रोबोटची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यांत येणार असल्याचे शेख यांनी सांगितले .

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाने आतापर्यंत पूर, नैसर्गिक आपत्ती किवा कोणत्याही आपत्ती वेळी, समाज उपयोगी संशोधन व उपयुक्त साधनांची निर्मिती केली आहे., सद्यःस्थितीतही कोरोना आपत्तीप्रसंगी सॅनिटायझर फवारणी सायकल व रोबोट अशी उपकरण येथे तयार करण्यांत आली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात उपयोगी ठरणारा रोबोट अत्यंत कमी खर्चात बनवण्यात शेख यांनी यश मिळविले आहे.

करोना रुग्णसेवकांच्या मदतीसाठी हा 'रोबोट' महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे अरिफ शेख यांनी सांगितले .शेख यांनी यापूर्वीही विविध उपकरणे तयार केली आहेत.

 

टॅग्स :SangliसांगलीRobotरोबोटCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या