आटपाडीत मुद्रांक विक्रेत्याकडून नागरिकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST2021-07-30T04:28:47+5:302021-07-30T04:28:47+5:30
करगणी : आटपाडी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाशेजारी बसणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांकडून सर्वसामान्य नागरिकांची लुबाडणूक सुरू असून शंभर रुपयांचा मुद्रांक ११० ...

आटपाडीत मुद्रांक विक्रेत्याकडून नागरिकांची लूट
करगणी : आटपाडी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाशेजारी बसणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांकडून सर्वसामान्य नागरिकांची लुबाडणूक सुरू असून शंभर रुपयांचा मुद्रांक ११० रुपये तर सुट्टीच्या दिवशी २०० रुपयांना विक्री होत असल्याचा आरोप मनसेचे आटपाडी तालुका कृषी सेलचे प्रकाश गायकवाड यांनी केला आहे. जादा दराने मुद्रांक विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन दुय्यम निबंधक यांना देण्यात आले आहे. आटपाडीतील प्रशासकीय इमारतीमध्ये सध्या दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. काही विक्रेते हे फक्त आपल्याकडे दस्त करणाऱ्यांनाच मुद्रांक देत आहेत. तर, काही विक्रेते जादा दराने विक्री करीत आहेत. अनेक परवानाधारक मुद्रांक विक्री करत नाहीत. अशा विक्रेत्यांचा परवाना रद्द करावा व अनेक विभागांमध्ये नवीन विक्रेत्यांना परवाना देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मनसेचे कृषी सेल अध्यक्ष प्रकाश गायकवाड, सांगली जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान पिंजारी, अभिजित सर्गर, मारुती खिलारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.