पेठ येथे तिळगंगा ओढ्यावरील रस्ता गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:21 IST2020-12-09T04:21:46+5:302020-12-09T04:21:46+5:30

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील मुख्य बाजारपेठेतून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाकडे जाणऱ्या तिळगंगा ओढ्याच्या पुलावरील मार्गाचा काही भाग वाहून ...

The road from Tilganga stream at Peth was carried away | पेठ येथे तिळगंगा ओढ्यावरील रस्ता गेला वाहून

पेठ येथे तिळगंगा ओढ्यावरील रस्ता गेला वाहून

पेठ : पेठ (ता. वाळवा) येथील मुख्य बाजारपेठेतून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाकडे जाणऱ्या तिळगंगा ओढ्याच्या पुलावरील मार्गाचा काही भाग वाहून गेला आहे. त्याची दुरूस्ती व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांतून होत आहे.

तिळगंगा ओढ्यावर या वर्षात चारवेळा महापूर आला होता. यामुळे या पुलावर असणारा डांबरी रस्ता वाहून गेला आहे. या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. मुख्य बाजारपेठेतून पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारा हा जवळचा मार्ग आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक व शेतकरी वर्गाची मोठी वर्दळ असते. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र खंडेश्वर मंदिर या मार्गावर आहे. त्यामुळे भाविकांची गर्दीसुद्धा याठिकाणी होत असते. तरी या पुलाची दुरूस्ती करावी, अशी मागणी शेतकरी, ग्रामस्थ, वाहतूकदार यांनी केली आहे.

फोटो ०८१२२०२०-आयएसएलएम-पेठ न्यूज- पेठ येथील तिळगंगा ओढ्यावरील रस्ता वाहून गेल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

Web Title: The road from Tilganga stream at Peth was carried away