प्रसाद माळीसांगली : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सांगली विभागातील दहाही आगार क्षेत्रांमधील अपघात प्रवण क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. सर्व १० आगारांनी आपापल्या क्षेत्रातील सर्व्हे करू विविध मार्गांवरील ४६ अपघात क्षेत्रांची नोंद केली आहे. या क्षेत्रांची यादी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांना पाठविण्यात आली असून, त्या ठिकाणी करावयाच्या सूचना सांगली विभागाकडून पाठविण्यात आल्या आहेत.एसटीच्या सांगली विभागाने जिल्ह्यातील विविध मार्गांवर एसटीचे वारंवार अपघात झाले आहेत. ती ठिकाणे अपघात क्षेत्रे म्हणून निश्चित केली आहेत. त्यांची यादी तयार करून त्या ठिकाणी करावयाची दुरुस्तीची सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे. संबंधित मार्गांवरील ब्लॅक स्पॉट हटण्याची प्रतीक्षा आता एसटीला करावी लागणार आहे.‘ब्लॅक स्पॉट’ची निश्चितीएखाद्या ठिकाणी एसटीचा जेव्हा तीन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अपघात होतो तेव्हा ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित करण्यात येते. जिल्ह्यातील यादी निश्चित करून व संबंधित क्षेत्रात करावयाच्या सूचना बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाला सुचवले आहे. त्या क्षेत्रात सूचनांची अंमलबाजवणी झाल्यावर ते ठिकाण संबंधित यादीतून काढण्यात येते.
अपघात क्षेत्र सुधारण्यासाठी केलेल्या सूचनाएसटीने सुचवलेल्या सूचनांमध्ये रस्ता रुंदीकरण, चौक रुंदीकरण, गतिरोधक, मार्गदर्शक फलक, वाढलेली झाडे काढणे, रस्ता दुरुस्ती, खड्डे बुजवणे, बोध चिन्हे, दिशादर्शक, तीव्र उतार कमी करणे, वेडीवाकडी वळणे काढणे आदी सूचना करण्यात आल्या आहेत.
आगार क्षेत्रनिहाय मार्ग व अपघात प्रवण ठिकाणमार्ग / ठिकाणसांगलीसांगली-कोल्हापूर/आदिसागर मंगल कार्यालयसांगली-कोल्हापूर/मिरज फाटा अंकलीसांगली-मिरज/वॉलचंद कॉलेजसांगली-इस्लामपूर/मिणचे मळा, तुंग
मिरजमिरज-पंढरपूर/तासगाव फाटामिरज-पंढरपूर/तानंग फाटामिरज-पंढरपूर/बालाजी मंगल कार्यालयमिरज-सांगली/सोरटूर कॉर्नर, मिशन हॉस्पिटलमिरज-मालगाव/लक्ष्मी मार्केट, दिंडीवेसमिरज-म्हैसाळ/नदिवेस, म्हैसाळ स्टँडमिरज स्टँड रोड/मिरज बसस्थानक प्रवेशद्वारतासगावतासगाव-खानापूर/गोटेवाडी फाटातासगाव-खानापूर/हातनूर भालेखडातासगाव-सावळज/सावर्डे फाटा-लोढेतासगाव-मिरज/कुमठा फाटातासगाव-मणेराजुरी/वासुंबे फाटा
विटाकडेगाव-तोंडाली/ताेंडोलीकडेगाव-खेराडे वांगी/सासपडेजत-विजयपूर/मुचंडीजत-सांगली/सुभेदार चढजत-उमदी/उमदी बसस्थानकजत ते सांगोला/गंध ओढा
आटपाडीभिवघाट-आटपाडी/गोमेवाडी हायस्कूल कदम वस्ती बसथांबाखरसुंडी-मिटकी/खरसुंडीपासून २ किमी अंतरावरआटपाडी बाह्यवळण व आबानगर पोलिस ठाणे चौक/आटपाडी आगार गेट व पंचायत समिती गेटमधील रस्ताकवठेमहांकाळकवठेमहांकाळ-जत/लिंबेवाडी फाटाकवठेमहांकाळ बसस्थानक/आगाराचे प्रवेशद्वार व बाहेर पडणारे द्वारकवठेमहांकाळ-सांगली/नागज फाटाकवठेमहांकाळ-सांगली/नूतन कॉलेज नरसिंहगाव, शिरढोणच्या पूर्वेकडील बायपास व पी. व्ही. पी. कॉलेजकवठेमहांकाळ-जत/जुने बसस्थानक
शिराळाशिराळा-बांबवडे/सांगाव रोड, नाथ फाटाशिराळा-मणदूर/बिऊर विठ्ठल नगरशिराळा-मणदूर/सोनवडे हायस्कूल बसथांबाशिराळा-खुंदलापूर/येळापूर खिंडशिराळा-वाकुर्डे/अंत्री बु. ओढ्याजवळ
पलूसपलूस-दुधोंडी/किर्लोस्करवाडी ते दुधोंडीपलूस-पुणदी/किर्लोस्करवाडी ते पुणदीपलूस-आंधळी/भोसलेनगर, सूतगिरणी जवळपलूस-आंधळी/पद्मानगर, आशीर्वाद बार जवळपलूस-किर्लोस्करवाडी/नवीन बसस्थानक ते जि. प. शाळा
तासगाव-कराड/विटा फाटाकराड-तासगाव/येळावी, बांबवडे फाटाकराड-तासगाव/येळावी फाटा, पाचवा मैल
Web Summary : Sangli ST division identified 46 accident-prone areas. The list, submitted to the Public Works Department and Collector's office, includes suggested improvements like road widening and sign installations to reduce accidents.
Web Summary : सांगली एसटी विभाग ने 46 दुर्घटना संभावित क्षेत्रों की पहचान की। लोक निर्माण विभाग और कलेक्टर कार्यालय को सौंपी गई सूची में सड़क चौड़ीकरण और संकेत स्थापना जैसे सुधार शामिल हैं ताकि दुर्घटनाओं को कम किया जा सके।