कुपवाडमध्ये किरकोळ कारणावरून रिक्षाचालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST2021-01-02T04:23:35+5:302021-01-02T04:23:35+5:30

कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यासमोर किरकोळ कारणावरून वसीम अल्लाबक्ष मुल्ला (३१, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) या रिक्षाचालकास ...

Rickshaw puller beaten for minor reasons in Kupwad | कुपवाडमध्ये किरकोळ कारणावरून रिक्षाचालकास मारहाण

कुपवाडमध्ये किरकोळ कारणावरून रिक्षाचालकास मारहाण

कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यासमोर किरकोळ कारणावरून वसीम अल्लाबक्ष मुल्ला (३१, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) या रिक्षाचालकास तीन अज्ञात तरुणांनी मिळून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कुपवाड एमआयडीसीतील ''मालास'' कंपनीसमोर २४ डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फ़िर्यादी वसीम मुल्ला हा रिक्षा घेऊन थांबला होता. यावेळी अज्ञात तिघेजण वसीमजवळ आले. त्यांनी वसीमला हॉटेलमध्ये वाद का घातलास, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण व शिवीगाळ करून जखमी केले. याबाबत मुल्ला याने मारहाण करणाऱ्या तिघा अज्ञातांविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुपवाड पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Rickshaw puller beaten for minor reasons in Kupwad